inspiring story of dr jannabi bhagwan persian phd holders own school for girls Sakal
सोलापूर

Motivation Story : लग्नानंतर सातवीपासून पीएच.डी.पर्यंत झेप घेत मुलींसाठी शाळा

डॉ. जन्नतबी बागवान यांचे कार्य, पर्शियनमध्ये पहिल्या पीएच.डी. धारक

प्रकाश सनपूरकर

Solapur News : लग्नाच्या वेळी सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या डॉ. जन्नतबी यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारून नोकरी व शिक्षणाचा समतोल साधत अध्यापन शास्त्र, मराठी, पर्शियन या भाषांमध्ये शिक्षण घेत पीएच.डी.पर्यंतचा प्रवास केला.

त्यानंतर समाजातील मुलींच्या शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती ओळखून महिला संस्थेच्या माध्यमातून स्वतःची शाळा सुरू केली. पर्शियनमध्ये पीएच.डी. करणाऱ्या त्या सोलापुरातील मुस्लीम समाजातील पहिल्या महिला आहेत.

जन्नतबी यांचे माहेर सोलापूरचेच आहे. त्या सातवीला शिकत असताना त्यांचा विवाह झाला. त्यांचे सासरे हे कर्नाटकातून सोलापुरात मिलकामगार म्हणून स्थायिक झाले. त्यांचे पती बशीर अहमद बागवान हे बॅंकेत नोकरी करत होते.

त्यांनी जन्नतबी यांना शिकण्यासाठी प्रेरणा दिली. पतीच्या पाठिंब्याने त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांना सातवीलाच असताना एका शाळेत शिक्षिकेची नोकरी लागली. शिक्षणाच्या स्पर्शाने त्यांची ज्ञानजिज्ञासा कायम वाढती राहिली. त्यांचे पती व कुटुंबीयांनी त्यांना घरकामातून सवड देत अभ्यासाला मदत करण्याची भूमिका घेतली.

त्यांनी नोकरी करत दहावी उत्तीर्ण केले. नंतर त्यांनी डीएडचे शिक्षण केल्याने त्यांच्या अध्यापन कार्यात गती वाढली. त्यांनी उर्दूत बीए पूर्ण केले. मराठी माध्यमात बीएड केले. उर्दूमध्ये एमए पूर्ण केले. उर्दूची मुळ जननी ही अरबी व पर्शियन भाषा असल्याने त्यांना पर्शियन भाषेत अधिक शिक्षण घेण्याची इच्छा झाली.

त्यांनी पर्शियन भाषेत एम. ए. केल्यावर त्या यूईएस संस्थेत प्राध्यापक झाल्या. त्यांनी नंतर पर्शियन भाषेत पीचडी मिळवली. शहरात पर्शियनमध्ये पीएचडी मिळवणाऱ्या त्या पहिल्या मुस्लीम महिला आहेत. नंतर त्यांनी पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून काम केले. त्यांनी विविध विद्यापीठात अभ्यासक्रम निर्मिती, उत्तरपत्रिका तपासणी, संशोधन कामासाठी देशभरात प्रवास केला.

अध्यापन करताना त्यांना मुलींच्या शिक्षणाबाबत समाजाकडून होत असल्याची जाणीव ठेवून त्यांनी त्यांनी एक महिला संस्था नोंदणी करून मुलींसाठी एक शाळा सुरु केली. आता ही शाळा सातवीपर्यंत चालवली जात आहे. मुलींमध्ये शिक्षणातून स्वावलंबनाच्या जाणीवेचा संस्कार करण्यासाठी त्यांचे कार्य सुरू आहे.

कुटुंबात अनेक भाषांचा संगम

डॉ. जन्नतबी बागवान यांच्या कुटुंबात अनेक भाषांचा संगम पाहण्यास मिळतो. त्या स्वतः मराठी, उर्दू, पर्शियन भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांचे पती बशीर अहमद बागवान हे मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत. त्यांचा मुलगा एमडी (आयुर्वेद) असल्याने त्यांनी आयुर्वेदासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान मिळवले. त्यांच्या एका मुलीने इंग्लिशमध्ये एमए केले आहे. त्यांचे जावई हे कन्नड भाषिक आहेत.

ठळक बाबी

  • बहिःस्थ विद्यार्थी म्हणून दहावी केले

  • सोशल उर्दू महाविद्यालयात बीए

  • वालचंद महाविद्यालयात मराठीत बीएड शिक्षण

  • सोशल महाविद्यालयात उर्दूत एमए

  • नागपूर विद्यापीठातून पर्शियन भाषेत एमए

  • पर्शियन भाषेत नागपूर विद्यापीठातून पीएचडी पूर्ण

  • एकूण पाच पदवी व पदव्युत्तर पदव्या

  • अक्कलकोट रोडवर चाँदतारा उर्दू मुलींच्या शाळेची स्थापना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT