स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतरही उभे केले ‘एम्पायर’  Sakal
सोलापूर

Success Story : स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतरही उभे केले ‘एम्पायर’

सकाळ वृत्तसेवा

माढा : स्पर्धा परीक्षेककडे ग्रामीण भागातील तरुणांचा ओढा आहे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून गाव सोडतात मात्र यश मिळाले नाही तर अनेक तरुण खचून जातात अन् निराशेच्या गर्तेत अडकतात मात्र,

माढा येथील मनोहर श्रीमंतराव माने-देशमुख याने स्पर्धा परीक्षेच्या अपयशाने खचून न जाता त्यावर मात करीत स्वतःचा व्यवसाय उभा करून त्यातून इतरांसाठी रोजगाराची निर्मिती केली आहे. एम्पायर केमिकल इंडस्ट्रीज व एम्पायर फायर सिस्टीम या कंपन्यांची स्थापना करत अनेकांना रोजगार मिळवून देत स्वतःही स्थिरस्थावर झाले आहेत.

प्रशासकीय सेवेमध्ये एमपीएससी व यूपीएससीच्या माध्यमातून जाता यावे यासाठी अनेक तरुण पदवीचे शिक्षण घेऊन पुणे, मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुण पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात.

या काळात घरची प्रतिकूल परिस्थिती, स्पर्धा परीक्षेत यश न आल्यास नोकरी व्यवसायाचा दुसरा पर्याय उपलब्ध नसणे, यामुळे स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतर अनेक तरुण खचून जातात. नोकरी मिळत नाही अन् शेतीही करता येत नाही अशा सर्व तरुणांसाठी मनोहर माने-देशमुख हे एक आदर्श उदाहरण ठरत आहेत.

श्री. देशमुख याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेतच नोकरी करायची हा चंग मनात बांधला असताना घरची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, घरामध्ये असलेल्या मोठ्या दोन बहिणी दोन भाऊ यांच्याच करिअरचा कुठे पत्ता नसताना स्वतः पुण्यातील जयकर लायब्ररीमध्ये मित्रांच्या बरोबरीने राहात.

चार पाच वर्षे सपर्धा परीक्षेचा अभ्यास करूनही यश मिळाले नाही. दुसऱ्या बाजूला घरातील आर्थिक अडचणी व चार मोठ्या भावांनांचे करिअर अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षेचे प्रयत्न सोडून देणेही अवघड होते व दुसरा व्यवसाय, नोकरी करणे ही अवघड होते. शेवटी मित्रपरिवार, पाहुणे यांच्या मदतीने श्री. देशमुख यांनी स्वतःच्या मालकीचा व्यवसाय करण्याचे ठरवच केमिकल इंडस्ट्री उभा केली.

विविध प्रकारच्या अडचणींवर मात करत आज ते अनेक लोकांना या केमिकल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत आहेत. केवळ एकाच इंडस्ट्रीवर न थांबता त्यांनी दुसरी इंडस्ट्रीज उभा केली. सध्या सोलार एनर्जी व पवन चक्की यावरही त्यांचे काम सुरू आहे.

स्पर्धा परीक्षेतील अपयश हे केवळ तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळू देत नाही. मात्र तुम्ही तिथे केलेले प्रयत्न, कष्ट, मेहनत ही तुम्हाला इतर व्यवसायामध्ये मदत करू शकते. कष्टाची सवय तुम्हाला यश निश्चित मिळून देते. हेच देशमुख यांनी दाखवून दिलेले आहे. अपयशामुळे खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यास यशाची दारे ही उघडी होतात हेच त्यांच्या प्रयत्नातून दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT