फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत त्यांनी सहभाग नोंदवला.
सोलापूर : येथील डॉ. ईशा अभय वैद्य (Dr. Isha Vaidya) यांची निवड मिस इंडिया (Miss India) स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धेत यश मिळवणाऱ्या त्या पहिल्या सोलापूरकर आहेत. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये झाली. त्यानंतर जयपूरमध्ये (Jaipur) या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत त्यांनी सहभाग नोंदवला. आता त्या सध्या दिल्लीमध्ये (Delhi) होणाऱ्या चाचणीत सहभागी झाल्या आहेत. डॉ. ईशा वैद्य या व्यवसायाने दंतरोगतज्ज्ञ (Dentist)) म्हणून कार्यरत आहेत. सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य (Senior journalist Ranga Anna Vaidya) यांचे पुतणे डॉ. अभय वैद्य (Dr. Abhay Vaidya) यांच्या त्या कन्या आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांनी सौंदर्य स्पर्धेच्या दृष्टीने अभ्यासाला सुरवात केली. सातत्याने त्यांनी विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागही नोंदवला.
या सौंदर्य स्पर्धेचे स्वरूप "ब्यूटी विथ ब्रेन' अशा प्रकारचे असते. योग्य आहार, व्यायामासोबत या प्रकारच्या स्पर्धांसाठी सामान्य ज्ञान व वैचारिक अभ्यासाची जोड देण्याचे काम त्यांनी सातत्याने चालू ठेवले. कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी केवळ स्वयंअध्ययनाच्या आधारावर काम सुरू केले. यापूर्वी त्यांना ग्लॅमानंद ग्रुप पुरस्कृत सौंदर्य स्पर्धेमध्ये संधी मिळाली. तेव्हा फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात त्यांची निवड 26 मुलींमध्ये त्यांची निवड झाली. त्यानंतर जयपूरमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या चाचणीत त्यांनी सहभाग नोंदवला. आता त्या सध्या दिल्लीमध्ये होणाऱ्या चाचणीत सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेत त्यांची निवड झाल्याने पुढील काळात मिस इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस ग्रॅंड मल्टिनॅशनल, मिस टुरिझम, मिस एशिया पॅसिफिक आदी स्पर्धांमध्ये त्यांना संधी मिळणार आहे.
दिलेल्या लिंकवर द्या डॉ. ईशा वैद्य यांना प्रतिसाद
या स्पर्धेत डॉ. ईशा वैद्य यांचा स्पर्धक क्रमांक 11 असून, त्यांच्या पसंतीसाठी सोलापूरकरांनी https://www.instagram.com/p/CSrYZTOJTo9/?utm_medium=copy_link या लिंकवर प्रतिसाद नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.