सोलापूर

Maharashtra-Karnataka Dispute : महाराष्ट्राच्या सीमावादात अडकलेला ८०० गावांचा प्रश्न केंद्रशासित करावा; ढोबळे

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : प्रधानमंत्री मोदीजींनी राष्ट्रहितासाठी ३७० कलम रद्द करून लेह, लडाख भाग केंद्रशासीत केला. त्याच धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सिमावादाचा विषय गेली सत्तर वर्षे बादात असून कोर्टाचा निर्णय लागेपर्यंत संतपूर, बिदर, भालकी, निप्पाणी, बेळगांव, कारवार हा दोन्ही राज्याच्या सरहद्दी लगतचा परिसर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत केंद्रशासीत करावा अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपाचे प्रांतिक सदस्य प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. दोन्ही राज्यांना बाजूला ठेवून केंद्राने हा प्रदेश केंद्रशासीत करावा म्हणजे वकुब नसलेली उथळ माणसं आणि उपद्रवमूल्य वाढत ठेवणारी गुंड लोक दंगा करणार नाहीत. दोन्ही राज्याचे तोंड बंद होईल. यापुढे जाऊन राज्याच्या बसेस फोडून सरकारी मालमत्तेची तोडफोड करून चमकोगिरी करत गोंधळ घालणार नाहीत.

वर्षानुवर्षे गेल्या सत्तर वर्षात गुण्यागोविंदाने वागणारे कर्नाटक राज्य आजच एवढे बिथरल्या सारखे का वागते याचा अंदाज येत नाही. तर विकास कामात चढउतार असतात. रस्तेविकासाच्या कामात अडचणी असतात. स्थानिक नेत्यावर लोकप्रतिनिधींवर विकास काम अवलंबून असते. परंतु अचानक आम्हाला रस्ते, पाणी, वीज द्या, सुधारणा करा. नाहीतर आम्ही शेजारच्या राज्यात जातो. असे कारस्थानी डोके कुणाचे ? याबद्दल चिंतन झाले पाहिजे. सलोख्याने वागणारा शेजारी आपले उणेपण झाकण्यासाठी आज बोमाईसारखा नेता दंगखोरांना उत्तेजन देतो.

यातच भर म्हणून चार महिने जेलमध्ये राहून आलेला माजुरी बोकड वाद सुप्रिम कोर्टात असताना खा. संजय राऊत आगीत तेल ओतण्याचे काम करतोय. अर्थात जेलमधून बाहेर आलेले संजय राऊत आणि आघाडीची सत्ता गेल्यामुळे रिकामे झालेले हात माजोरीपणाने मोर्चे काढताना दिसतात. वातावरण आग लावणारे ठरत असून हे सारे माजूरीपणाचे कारस्थान तात्काळ बंद करण्यासाठी केंद्र सरकारने दोन्ही राज्यं भाषिक प्रश्नावर या भागावर अधिकार सांगतात.दोन राज्यांमध्ये वादात असलेला कारण 800 गावांचा परिसर केंद्रशासीत करण्यात यावा. असे प्रा. ढोबळे यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs UBT Nanded: नांदेड विमानतळावर राडा; ठाकरेंच्या खासदाराला भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं

Latest Maharashtra News Updates: प्रभादेवी जंक्शन परिसरातील रस्ता खचला

Face Yoga Health Benefits : फेसयोगामुळे चेहऱ्याची ठेवण राहील आखीव रेखीव! डबल चीन, सुरकुत्या, कोमेजलेल्या त्वचेपासून होईल सुटका

Ganesh Festival In Pakistan: पाकिस्तानात दीड दिवसाचा गणेशोत्सव थाटात; कराचीच्या रस्त्यांवर घुमला 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाज

हे काय झालं! Ruturaj Gaikwad दोन चेंडू खेळून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला, कारण काय...

SCROLL FOR NEXT