Solapur  sakal
सोलापूर

Solapur : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लावू ; अजित पवार

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न गेली पंधरा वर्षे राजकीय व्यासपीठावर तरंगत असून अजून मंजुरी न मिळाल्यामुळे नुकतीच या गावातील सरपंचांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत ही गावे कर्नाटकला जोडण्याची मागणी केली होती त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामेश्वर मासाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील दुष्काळी गावातील सरपंचाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर गेले. आज सकाळी 7.30 वाजता त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी समवेत भेटून पाणी प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माधवानंद आकळे(हाजापूर), सुनील थोरबोले(रड्डे), संजय पाटील(येड्राव), बिरूदेव घोगरे (निंबोणी) ,लक्ष्मण गायकवाड(भाळवणी), सचिन चौगुले(जालीहाळ), ऋतुराज बिले (पाठखळ),प्रशांत साळे (लक्ष्मी दहिवडी)आधी सह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील असून दुपारी जलसंपदा विभागाची बैठक असून त्या बैठकीमध्ये या प्रश्नाच्या संदर्भात जलसंपदा सचिवाकडून माहिती घेऊन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करणार असल्याचे सांगून पोटनिवडणुकीनंतर त्याबाबत काही हालचाल झाली नाही का ? असे विचारत एवढे दिवस प्रश्न का रखडला याची देखील विचारणा या शिष्टमंडळाला केली. त्यामुळे आता मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा चेंडू दोन उपमुख्यमंत्र्यांच्या कचाट्यात अडकलेला आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी याला मंजुरी मिळणार का याची प्रतीक्षा या गावातील गावकऱ्यांना लागली. तर हा चेंडू पुन्हा राजकीय कचाट्यात अडकला तर याचे पडसाद कडक उन्हाळ्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर जाणवणार एवढे मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ उमेदवार आघाडीवर! भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस १, शेकाप १, ‘तुतारी’चे २, उठाबा शिवसेना १, पोस्टल मतांची मोजणी पूर्ण, आता फेऱ्यांना सुरवात

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

SCROLL FOR NEXT