poshan aahar 
सोलापूर

पोषण आहारात मिळणार पौष्टिक पाव! शिक्षण विभागाच्या हालचाली

संतोष सिरसट

त्या अनुषंगाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे, याची माहिती राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागितली आहे.

उ. सोलापूर (सोलापूर): राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आता शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पौष्टिक पाव न्यूट्रीटिव्ह स्लाईस (पौष्टिक पाव) वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे, याची माहिती राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागितली आहे.

पहिली ते आठवीच्या शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार या योजनेअंतर्गत पोषणमूल्य युक्त पौष्टिक पाव देण्यासाठी शिक्षण संचालनालय स्तरावर ठेकेदाराची नियुक्ती केलेली आहे. या विद्यार्थ्यांना पौष्टिक पाव देण्याचा निर्णय झालेला आहे. तेव्हा राज्यातील प्रत्येक प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा निहाय व व्यवस्थापन निहाय विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती शिक्षण विभागाला द्यायची आहे. ही माहिती देताना जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा, नगरपालिका शाळा, कटक मंडळातील शाळा, शासकीय व खासगी अनुदानित शाळा याची नोंद अचूकपणे करायची आहे.

याशिवाय मुख्याध्यापकांचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक अचूकपणे नोंदवायचा आहे. जेणेकरून पौष्टिक पाव वाटपाचे नियोजन करताना संबंधितांना संपर्क करणे सुलभ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची माहिती देताना 1 ऑगस्ट 2021 ची माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. शालेय पोषण आहारामध्ये यापूर्वी तांदूळ, मुगडाळ, तुरडाळ इत्यादींचे वाटप करण्यात येत होते. त्याबरोबरच आता विद्यार्थ्यांना पौष्टिक पावही खायला मिळणार आहे.

मागील वर्षापासून राज्यभर कोरोनाचा फैलाव झालेला आहे. त्यामुळे पहिली ते आठवीचे वर्ग सध्या बंद आहेत, अशा वेळी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शाळा स्तरावरून वाटप केला जात आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून तांदूळ, मूगडाळ, तुरदाळ दिली जात आहे. त्याच्या जोडीला आता विद्यार्थ्यांना पोष्टिक पावही मिळणार आहे.

फोट्रिफाइड तांदूळाबाबत संभ्रम

केंद्र शासनाच्या नवीन धोरणा मुळे कोविड च्या काळात विद्यार्थ्यांना फोर्टिफाइड तांदूळ वितरीत केला जात आहे. नेहमीच्या तांदळापेक्षा हा तांदूळ थोडासा पिवळसर आहे. नियमित एक किलो तांदूळ असेल तर त्यामध्ये हा तांदूळ 10 ग्रॅम टाकला जातो. मात्र हा तांदूळ पाण्यावरती तरंगत असल्याच्या तक्रारी नगर व पालघर या जिल्ह्यातून आल्या आहेत. त्यामुळे हा तांदूळ प्लास्टिकचा आहे की काय अशी शंका निर्माण केली होती. मात्र तो तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टिफाइड असल्याचे प्रयोगशाळेतून सिद्ध झाले आहे. त्यामुळे या तांदळाबाबत असलेला संभ्रम शिक्षकांनी दूर करण्याचे आवाहनही शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मध्ये कोट्यवधींचा घोटाळा, RTIकडून खुलासा, ट्विट करत काँग्रेस नेत्याचे महायुतीवर टीकास्त्र

Shri Thanedar: ट्रम्प लाट असूनही मराठमोळ्या नेत्याने उधळला विजयाचा गुलाल! दुसऱ्यांदा बनले अमेरिकेचे खासदार, कोण आहेत श्री ठाणेदार ?

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

USA Election 2024: राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! सोशल मीडियावर मिम्सचाही पाऊस

Latest Marathi News Updates live: महाविकास आघाडीच्या सभेत जयस्तुते गाण्याच सादरीकरण

SCROLL FOR NEXT