IT Park to be set up Solapur 800 crore investment of Aryan Manohar Jagtap sakal
सोलापूर

Solapur News : सोलापूरला साकारणार ‘आयटी पार्क’; ‘आर्यन’ची ८०० कोटींची गुंतवणूक

‘आर्यन्स’चे सीईओ अन्‌ सीएफओ मनोहर जगताप यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : गिरणगाव सोलापुरात आयटी पार्क साकारण्याच्या इथल्या अवघ्या तरूणांच्या इच्छेला मूर्त स्वरूप येणार आहे. येथे प्रत्यक्ष आयटी पार्क साकारले जाणार आहे. येत्या दोन ऑगस्टला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

सोलापूरच्या आयटी पार्कसाठी आर्यन कंपनी ८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. या नियोजित आयटी पार्कमधून येथील तज्ज्ञ आणि प्रशिक्षित दोन हजार युवकांना पहिल्या टप्यात काम मिळणार आहे.

अत्याधुनिक आयटी पार्कच्या माध्यमातून सोलापूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीएफओ मनोहर जगताप यांनी आज शनिवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत ही सोलापुरकरांसाठी गुड न्यूज दिली.

सोलापुरातील आयटी पार्कची माहिती देण्यासाठी महेश कोठे यांच्या ‘राधाश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सीईओ मनोहर जगताप बोलत होते. यावेळी कंपनीचे संचालक करण लोहार, संचालक संजय शेंडगे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, सूर्यप्रकाश कोठे, विनायक कोंड्याल, कुमुद अंकाराम, विद्या लोलगे आदी उपस्थित होते.

डोणगाव रोड येथील कोठे यांच्या जागेत आणि चिंचोळी एमआयडीसी येथील १०० एकर जागेवर आयटी पार्क उभारण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी सोलापूरच्या भौगोलिक स्थितीचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला आहे. सोलापुरातील युवक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने पुणे, हैदराबाद, मुंबई चेन्नई, बंगलोर येथे स्थलांतर होत आहे.

सोलापुरातील स्किल बाहेरच्या शहरात वापरली जाते. ते स्किल सोलापुरातच राहिले पाहिजे. यासाठी आर्यन कंपनीने सोलापुरातील आयटी पार्कसाठी पहिलेच पाऊल उचलत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सोलापूरच्या आयटी पार्कमध्ये बनणार सर्च इंजिन

आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनी आयटी क्षेत्रात काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर देखील काम करत आहे. कंपनी पूर्णतः भारतीय बनावटीचे सर्च इंजिन बनविणार आहे. कंपनीसाठी हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

कारण गुगल किंवा इतर सर्च इंजिन देशाबाहेरील आहेत. ज्यामुळे भारताच्या दृष्टिने हा एक सुरक्षेचा विषय आहे.

याबरोबरच कंपनी भारतीय बनावटीचे वेब ब्राउजर देखील बनवत आहे. जे पूर्णपणे सुरक्षित असेल. आयटी पार्कची सोलापूरकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असल्याचेही श्री.जगताप यांनी सांगितले.

सोलापुरात आयटी पार्क उभारले जावे, हे अनेक वर्षाचे आहे. हे स्वप्न राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नाने व आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर जगताप यांच्या साह्याने स्वप्न पूर्ण होत आहे. गेल्या दहा-वीस वर्षांपासून यावर मी नेहमी बोलतो. आयटी पार्कसाठी माझा कायम पाठपुरावा राहिला आहे. विद्यमान आमदार जे करू शकले नाही, ते मी करत आहे याचे समाधान आहे

- महेश कोठे, माजी महापाैर तथा उद्योजक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT