शेतकऱ्यांनीच केली कारखानदारांच्या साखर उताऱ्याची पोलखोल! esakal
सोलापूर

शेतकऱ्यांनीच केली कारखानदारांच्या साखर उताऱ्याची पोलखोल!

शेतकऱ्यांनीच केली साखर उताऱ्याची पोलखोल! कारखान्यात 8.50 तर शेतात 11 टक्के

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

सर्वाधिक ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यात झाले असले तरी, सोलापूर जिल्हा मात्र साखर उताऱ्यात पिछाडीवर राहिला आहे.

पंढरपूर (सोलापूर) : राज्यातील 186 साखर कारखान्यांनी (Sugar Factory) आतापर्यंत सुमारे 193 लाख मेट्रिक टन उसाचे (Sugarcane) गाळप केले आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस गाळप सोलापूर जिल्ह्यात झाले असले तरी, सोलापूर जिल्हा (Solapur District) मात्र साखर उताऱ्यात पिछाडीवर राहिला आहे. सोलापूर विभागाचा सरासरी साखर उतारा 8.50 टक्के इतका आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatna) कार्यकर्त्यांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन ब्रिक्‍स मशीनद्वारे (Brix Machine) साखर उतारा (Extract Sugar) चेक केला असता 11 टक्के उतारा मिळाला. कारखान्यांमध्ये मिळणाऱ्या आणि प्रत्यक्ष शेतात मिळणाऱ्या साखर उताऱ्यातील तफावतीनंतर साखर उताऱ्यातील पोलखोल समोर आली आहे. यातून तब्बल अडीच टक्के उतारा कमी दाखवला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. (It was the farmers who exposed the erroneous figures from the sugar mills)

सोलापूर जिल्ह्यातील 33 कारखान्यांनी आतापर्यंत 68 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांमध्ये 58 लाख टन मेट्रिक उसाचे गाळप झाले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा राज्यात ऊस गाळपात आघाडीवर असला तरी साखर उताऱ्यामध्ये मात्र तो पिछाडीवर राहिला आहे. सरासरी साखर उतारा मिळत असल्याने त्याचा पुढील वर्षीच्या एफआरपीवर (FRP) मोठा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमधून याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

यावर्षीच्या हंगामात राज्यातील 186 साखर कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर विभागात सर्वाधिक 43 साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर विभागात 35 व पुणे (Pune) विभागात 29, नांदेड (Nanded) व नगर (Nagar) विभागात प्रत्येकी 26, नागपूर (Nagpur) व अमरावती (Amravati) विभागातील प्रत्येकी दोन साखर कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 68 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्या खालोखाल कोल्हापूर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 58 लाख टन उसाचे गाळप केले आहे. नगरच्या 22 व पुणे जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी 42 लाख टन उसाचे गाळप केले आहे. सांगली व सातारा जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांनी 30 लाख टन उसाचे गाळप केले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांनी मिळून 17 लाख टन उसाचे गाळप केले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पंढरपूर (Pandharpur), माळशिरस (Malshiras), माढा (Madha), करमाळा (Karmala) या भागात उच्च प्रतीचा व दर्जेदार ऊस असतानाही साखर उतारा इतका कमी का, याविषयी शेतकऱ्यांमधून शंका उपस्थित केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील (Sachin Patil) यांनी रविवारी (ता. 19) स्वतःच्या शेतातील को 86032 व को. 265 ऊस जातीचा ब्रिक्‍स मशीनद्वारे साखर उतारा तपासला असता तो 11 टक्के असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्यक्ष शेतातील उसाला मिळणारा साखर उतारा आणि साखर कारखान्यात मिळणारा साखर उतारा यात तब्बल अडीच टक्‍क्‍यांची तफावत आढळून आली.

दरम्यान, याबाबत सोलापूर येथील साखर सहसंचालक पांडुरंग साठे (Pandurang Sathe) यांना विचारले असता, यावर्षी बहुतांश साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळे साखर उतारा कमी मिळत असल्याचे सांगितले. तरीही साखर उताऱ्याविषयी शेतकऱ्यांमधून शंका व्यक्त केली जात आहे.

राज्यातील विभागनिहाय साखर उतारा

  • कोल्हापूर विभाग : 10.72

  • पुणे विभाग : 9.69

  • सोलापूर विभाग : 8.05

  • अमरावती : 8.27

  • नागपूर : 7.42

  • नगर : 8.86

  • औरंगाबाद : 8.69

  • नांदेड : 9.07

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

SCROLL FOR NEXT