journey of Kem Parmeshwar Talekar cattle products solapur sakal
सोलापूर

गाईंनी दाखवला स्वावलंबी जीवनाचा मार्ग; परमेश्वर तळेकर यांच्या गो-उत्पादनांचा प्रवास

शेतीमध्ये गाईचा सांभाळ करून पंचगव्य उत्पादनांची निर्मिती करत एक उत्तम व्यवसायाची संधी उभी केली आहे. स्वतः उत्पादने तयार करून ते स्वतः विक्री करत आहेत

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकरी परमेश्वर तळेकर यांनी शेतीमध्ये गाईचा सांभाळ करून पंचगव्य उत्पादनांची निर्मिती करत एक उत्तम व्यवसायाची संधी उभी केली आहे. स्वतः उत्पादने तयार करून ते स्वतः विक्री करत आहेत. यामधून त्यांनी गोपालनाचे अर्थकारण मजबूत करत शेतीचा उत्पादनखर्च शून्यावर आणत शेती फायद्याची केली आहे. त्यांनी उभे केलेले केमचे गोमाता मंदिर एक वेगळी ओळख गोपालन क्षेत्रात बनली आहे.

परमेश्वर तळेकर यांची शेती पूर्वी रासायनिक होती. भरमसाठ खर्च करूनही त्यांच्यावर पाच लाखांचे कर्ज झाले होते. त्यानंतर ते गोपालनाकडे वळाले. भाकड गायी व चांगल्या गायी त्यांनी शेतात सांभाळल्या. एकूण ३५ खिलार गाई त्यांच्याकडे आहेत. या गाईच्या मदतीने त्यांनी स्वतः उत्पादने तयार करण्यात सुरवात केली. एकूण १५ प्रकारची उत्पादने ते तयार करतात. ही उत्पादने तयार करून त्यांच्याकडे मागणी आली तसा पुरवठा करतात. विशेष म्हणजे मागणी आल्यानंतर ते ही उत्पादने घरपोच नेऊन देतात. सोलापूरसह अनेक शहरांत ते ही सेवा देतात.

गाईचा सांभाळ अगदी सहजपणे त्यांचे कुटुंब करत असते. गाईपासून शेणखत व इतर जैविक खते तयार करून त्यांनी शेतीचा उत्पादन खर्च अगदी कमी केला आहे. त्यामुळे शेती देखील फायद्यात आली आहे. आज ते उत्तम पद्धतीने शेती व गोपालन करत आर्थिक प्रगती साधत आहेत. याशिवाय त्यांनी स्वतः अनेक शेतकऱ्यांना गो आधारित शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच काही शेतकऱ्यांना गाई देखील दिल्या आहेत.

गाईच्या शेणापासून फरशी व विटांची निर्मिती

परमेश्वर तळेकर यांनी गाईच्या शेणापासून एकदम मजबूत फरशी त्यांनी बनवली आहे. तसेच विटा देखील बनवल्या आहेत. गाईचे शेण वापरूनच तयार केलेल्या साहित्यावरच त्यांनी घर बांधण्याचे ठरवले आहे.

ठळक बाबी

  • एकूण ३५ गाईचा सांभाळ गो-उत्पादनांची संख्या १५

  • एकाच गाईपासून उत्पादनांची निर्मिती

  • चारा व अकरा जणांच्या कुटुंबाचा भागतोय खर्च

  • गो-उत्पादनातून आरोग्य, सन्मान व स्वावलंबन

मी स्वतः हा निर्णय घेतला तेव्हा माझ्यावर रासायनिक शेतीचे पाच लाखांचे कर्ज होते. आज कर्जमुक्त राहून गो-उत्पादनांवर कुटुंबाचे भागत आहे. तसेच माझा मुलगा देखील या कामात प्रवीण झाला आहे.

- परमेश्वर तळेकर, गोपालक, केम, ता. करमाळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT