sugar factory sakal
सोलापूर

करमाळा : कार्यक्षेत्रातील ऊस सोडून बीडच्या ऊसाचे कारखान्याकडून गाळप

265 वाण असलेल्या ऊसाची नोंद नोव्हेंबर 2021 पर्यंत घेण्याचे आदेश साखर आयुक्तांचे कारखानदारांना होते.

आण्णा काळे

करमाळा : करमाळा तालुक्यातील कमलाभवानी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस सोडून बीड, गेवराईच्या ऊसाचे कमलाभवानी कारखान्याकडुन गाळप होत असल्याने कार्यक्षेत्रातील ऊस वाळुन चालला असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत समितीचे करमाळा तालुकाध्यक्ष अॅड. शशिकांत नरुटे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. (Karmala Sugar Factory Sugacane Crushing)

अॅड. नरुटे म्हणाले,कारखानदारांना ऊस गाळप परवाना हा कारखाना कायक्षेत्र व लाभक्षेत्रातील उसाच्या नोंदीवरून दिला जातो. मात्र लाभक्षेत्रातील ऊसच गाळपास नेला जात नसेल तर हे कारखानदारांचे हे गैरकृत्य तहसीलदार, जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.

265 वाण असलेल्या ऊसाची नोंद नोव्हेंबर 2021 पर्यंत घेण्याचे आदेश साखर आयुक्तांचे कारखानदारांना होते. मात्र संबंधित शेतकऱ्यांचा ऊस आजपर्यंत आडसाली व पूर्व हंगामी ऊस गाळपास नेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.कारखान्याचे प्रदुषण आम्ही सोसायचे आणि ऊस माञ बीड, गेवराई हुन आणायचा हे अन्यायकारक आहे. कमलाई साखर कारखानदार लाभक्षेत्राबाहेरील ऊस कमी दराने गाळपासाठी आणत आहे. त्यामुळे कारखान्याच्या जवळचे ऊस शेतातच वाळुन चालले आहेत. ऊसाने तुरे टाकले आहेत.

क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला एफआरपीप्रमाणे व कारखानदाराने घोषित केलेला दर द्यावा लागतो. मात्र कारखाना कार्यक्षेत्र व लाभक्षेत्र सोडून बीड,गेवराई, भुम व इतर ठिकाणावरून 1700 ते 1800 दराने ऊस आणुन गाळप केला जात आहे. यामुळे अनेक लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस पूर्व हंगामी व अडसाली ऊसाचा तोडण्याचा कालावधी होऊन गेला आहे.

त्यामुळे कारखान्यापासुन हाकेच्या अंतरावर असलेला ऊस वाळून चाललेला आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा व करमाळा तालुक्यातील लाभक्षेत्रातील ऊस गाळप करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. वेळ प्रसंगी बाहेरून आणलेल्या ऊसाची वाहने अडवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असेही ते म्हणाले. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT