मोहोळ तालुक्‍यात 13 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी ! Canva
सोलापूर

मोहोळ तालुक्‍यात 13 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी !

मोहोळ तालुक्‍यात 13 हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी ! कांदा नासण्याच्या मार्गावर

राजकुमार शहा

चालू खरीप हंगामात तालुक्‍यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, मटकी या पिकांच्या पेरणीला वेग आला आहे.

मोहोळ (सोलापूर) : चालू खरीप हंगामात मोहोळ तालुक्‍यात (Mohol Taluka, Solapur) विविध कडधान्यांची तेरा हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, आतापर्यंत तालुक्‍यात केवळ 225 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष, डाळिंब व पेरू आदींसह अन्य फळबागधारक किडीच्या प्रादुर्भावामुळे फवारणी करून बेजार झाले आहेत. त्यावर हजारोंचा खर्च होत आहे. पेरणीबरोबरच कांदा, टोमॅटो, मिरची, गवार आदींसह अन्य पालेभाज्यांची 3 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर आंबा, लिंबू, सीताफळ, केळी या फळबागांची 389 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल पवार (Atul Pawar) यांनी दिली.

चालू खरीप हंगामात तालुक्‍यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, मटकी या पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. प्रत्येक आषाढ महिन्यात फक्त सोसाट्याचे वारे असतात, मात्र सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांसह ऊस लागवडीलाही वेग आला आहे. लॉकडाउनच्या काळात प्रदूषण कमी झाल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. गेल्या आठवड्यातील पुनर्वसू नक्षत्राच्या भीज पावसाने ग्रामीण भागातील जुनाट व खनाची घरे तसेच भिंती पडल्या आहेत. कडधान्याबरोबरच तालुक्‍यातील काही भागात वांगी, भेंडी, कांदा या पिकांसह गुलाब, शेवंती, झेंडू यांची फुलशेतीही बहरू लागली आहे.

बैलांची संख्या कमी झाल्याने चालू वर्षी सर्व शेतीच्या मशागतीची कामे व पेरणी लहान ट्रॅक्‍टरवरच अवलंबून आहेत. चालू वर्षी कांदा, टोमॅटो या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. भीज पावसाने कांद्याच्या बुडातील ओल न हटल्याने कांदा नासण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. इतर पिकांबरोबर आता शेतकरी पीक पद्धतीत बदल करू लागला आहे. औषधी वनस्पतीची लागवडही केली आहे. डाळिंब, द्राक्ष याबरोबर आंबा, लिंबू, सीताफळाचे क्षेत्रही विस्तारत आहे.

मोहोळ तालुका हा आष्टी जलाशय, उजनी डावा कालवा, आष्टी उपसा सिंचन योजना यामुळे जवळजवळ संपूर्ण बागायती झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात विविध कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. मात्र बाजारात बनावट औषधांची विक्री सुरू आहे. दुकानदार अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन ही कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे कीटकनाशके कितीही फवारली तरी पिकांवर म्हणावा तसा परिणाम होत नाही. खरी कीटकनाशके कोणती व बनावट कोणती हे शेतकऱ्यांना समजत नाही. त्यासाठी जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात येऊन शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. अन्यथा शेतकरी तोट्यातच जाणार आहे तर अधिकाऱ्यांची खुर्चीवर बसून पोटं मोठ्ठी होणारच आहेत. अधिकारी व दुकानदार यांचे संगनमत असल्याने कारवाई होईल का नाही, याबाबत शासंकता आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांमधून सुरू आहे.

मोहोळ तालुक्‍यातील पेरणी व लागवड क्षेत्र पुढीलप्रमाणे (सर्व आकडे हेक्‍टरमध्ये)

  • बाजरी - 37, मका - 3524, तूर - 2630, उडीद - 1730, मूग - 303, मटकी - 14, भुईमूग - 611, तीळ - 1, सूर्यफूल - 14, सोयाबीन - 4146

भाजीपाला लागवड...

  • कांदा - 997, टोमॅटो - 1298, मिरची - 467, वांगी - 315, भेंडी - 148, दोडका - 128, गवार - 84, हळद - 1, आले - 2.

फूलशेती...

  • गुलाब - 2, झेंडू - 77, शेवंती - 64, औषधी सुगंधी वनस्पती - 3

फळबागा लागवड----

  • आंबा - 21, लिंबू - 28, सीताफळ - 16, केळी - 82, द्राक्ष - 57, पेरू - 25, नारळ - 5, पपई - 13, डाळिंब - 135, चिक्कू - 3, बोर - 4

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा

Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Latest Marathi News Updates live: मोदी आमची थट्टा करतात, पण तुम्ही दिलेली एक तरी गॅरंटी पूर्ण केली का? - खर्गे

SCROLL FOR NEXT