nannaware.jpg 
सोलापूर

कृषिभूषण नागेश नन्नवरे यांचा सेंद्रिय शेतीत हातखंडा 

दयानंद कुंभार

वडाळा (सोलापूर) ः उत्तर सोलापूर तालुक्‍यातील दारफळ बीबी येथील नागेश नन्नवरे यांनी शेतीची आवड आणि शेतीत विविध उपक्रम करण्याची भारी हौस असल्याने ते सेंद्रिय शेती कडे वळले.त्यानी 2012 पासुन सेंद्रिय शेती करण्यास सुरु केली.पुर्वी ते रसायनिक शेती करत असताना आतिरिक रासायनिक खतांचा वापरमुळे जमिन नापिक होत असल्याचे निदर्शनास आले.यामुळे उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी व हायब्रीड बियाणे यांच्या वापरामुळे माझी शेती अडचणीत आली.नंतर 2012 पासून सेंद्रिय शेतीत वेगवेगळे प्रयोग करत रासायनिक खतापासून जमीनीची सुटका करत विषमुक्त अन्न पिकवुन शेतकरी ते ग्राहक विक्री करण्यास सुरुवात केली.याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने नुकताच सेंद्रिय शेतीतील कृषिभुषण पुरस्कार जाहीर केला आहे. 

मिश्र पिकांचा प्रयोग 
2021मध्ये कादां पिकांचे उत्पादन चांगले मिळाले कांदा पिक पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्याने बाजारात दर ही चांगला मिळाला . तसेच 30 गुंठ्यात देशी केळी ,देशी पपई, ज्वारी, हरभरा, झेंडू, आबांडी भाजी, चवळी अशी सात प्रकारच्या मिश्रपिकांचे मॉडेल तयार केले. यामध्ये केळी, पपई, झेंडूची सप्टेंबर मध्ये लागवड केली. दिवाळीला झेंडू ला बाजारात चागंला 25 रू पासुन 120रु दर मिळाला. त्यातुन केळी व पपईचा उत्पादन खर्च निघाला. तसेच हरभरा 11 क्विंटल व ज्वारीचे 2 क्विंटल उत्पादन मिळाले. यामुळे मिश्र पिकांमुळे इतर खर्च निघाला. 
विषमुक्त गुळ आणि काकवी .. 
सेंद्रिय पद्धतीने 10 गुंठे क्षेत्रात 15 टन ऊस उत्पादन घेतले. त्या ऊसापासून गुळ व काकवी तयार केली. 15 टन ऊसापासुन दीड टन गुळ व काकवी 500 लिटर उत्पादन घेतले. गुळाला 100 रु प्रती किलो व काकवीला 1 लिटरला 150 रु दर मिळाला आहे तेही पूर्णपणे विषमुक्त. 
सेंद्रिय पिकवा, खर्च टाळा आणि निरोगीही रहा.. 
गेल्या काही वर्षापासुन नागेश नन्नवरे हे नैसर्गिक रित्या शेती करुन 'विषमुक्त खा आणि निरोगी रहा' असा संदेश देत आहेत. सेंद्रिय शेती करताना सर्व पिकांना लागणारी खते शेतावर तयार करता येतात. बाजारातून काहीही विकत आणून टाकायची गरज लागत नाही.कोणतीही कुणाकडूनही खते घेताना फसवणुक अथवा पिळवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही. 
देशी गायीच्या शेण गोमुत्रचा वापर करून एका गायी पासून 30 एकर शेतीला फायदा होतो. सगळ्यात महत्त्वाचे आपले अथवा ग्राहकांचे आरोग्य चांगले राहते.सध्या रासायनिक खते व जहाल असणारी किटकनाशकांच्या औषधांच्या अति वापरामुळे फळे ,भाजीपाला खाऊन नागरिक हळूहळू क×न्सर सारख्या अनेक व्याधीं होत आहेत.यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे.सेंद्रिय शेतीची चळवळ रुजवण्याठी शासनस्तरांवरुन ही भक्कम नियोजन व भरीव तरतूद केली तर निरोगी भारत होणार आहे. 
सध्या नागेश यांनी 'शभुंराजे' नैसर्गिक शेती उत्पादने नावाने गूळ व काकवी ऊसाच्या रसापासून काकवी (पाक), गूळ, असे पदार्थ निर्माण केले आहेत. आपल्या देशात गूळ ,काकवी हे पदार्थ बनवतात. पण पश्‍चिमात्य देशांनी साखर हा पदार्थ बनवायला सुरुवात केली. साखर तयार करताना त्यात जवळवळ 23 प्रकारची रसायने वापरली जातात. म्हणून साखरेला जाणकार नागरिक गोड विष म्हणतात. गूळ व काकवी हे पदार्थ खाल्ले असता ते स्वतः लवकर पचतात व इतर पदार्थांना सुद्धा पचनाला मदत करतात. गूळ व काकवी पचायला 4 ते 5 तास लागतात तर साखर पचायला 7 ते 8 तास लागतात शिवाय साखर इतर पदार्थांना पचायला मदत करत नाही उलट अडथळा करते. सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गूळ आरोग्यासाठी अमृत आहे. कारण गुळाला पचवायला जर 100 कॅलरी ऊर्जा लागते तर साखरेला पचवायला 500 कॅलरी ऊर्जा लागते.गूळ त कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न, कॉपर, नायसिन,हे घटक असतात व हे घटक आपल्याला अत्यंत आवश्‍यक असतात. असे नागेश नन्नवरे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT