Bank of India Sakal
सोलापूर

Bank of India : नेटवर्क अभावी लऊळ येथील बॅक ऑफ इंडियाचे व्यवहार ठप्प

सध्या ऑनलाईनच्या जमान्यात सर्व बॅकेच्या ग्राहकांना बॅकेत जास्त वेळ थांबावे लागत नाही.

वसंत कांबळे

कुर्डू - लऊळ, ता. माढा येथील बॅक ऑफ इंडियामध्ये नेटवर्क नसल्याने लऊळ, चिंचोली, पडसाळी, भेंड, उजनी (मा.) या गावातील ग्राहकांच्या दोन दिवसापासून व्यवहारासाठी रांगा लागल्या आहेत. कधी नेटवर्क येईल सांगण्यात येत नाही.

सध्या ऑनलाईनच्या जमान्यात सर्व बॅकेच्या ग्राहकांना बॅकेत जास्त वेळ थांबावे लागत नाही. शेतकऱ्यांचा पोळा सण गुरुवारी म्हणजे तोंडावर आला असून, पैसे काढण्याचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सुर निघत आहे.

सणाची खरेदीसाठी सावकाराची दार पुजण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. बॅकेतील कर्मचारी सोमवारी सायंकाळी नऊ वाजेपर्यंत नेटवर्कची वाट पाहत बसले तरी सिस्टीम चालू नसल्याने ग्राहकांच्या रोषाला कर्मचारी यांना सामोरे जावे लागत आहे.

याच बॅकेचे मॅनेजर विजय नाईक हे आपल्या शाखेच्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी कुर्डुवाडी येथील बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत बसून कामकाज करत आहेत.

या 'फाईव-जी'च्या जमान्यात ग्रामीण भागातील बॅक कर्मचारी व ग्राहकांवर अशी वेळ येत असेल तर कामकाज कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत बॅक ऑफ इंडिया सोलापूर येथील क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला असता आयटी विभागाकडे चौकशी करतो असे सांगून परत फोन उचलला नाही.

याबाबत रांगेत उभे असलेल्या खातेदाराशी प्रतिक्रिया विचारली असता मी सोमवारी व आज मंगळवार दोन दिवस झाले सलग पैसे काढण्यासाठी येत आहे. नेटवर्क नसल्याचे सांगण्यात येत आहे. या नेहमीच होणाऱ्या गैरसोयमुळे या बॅकेत खाते ठेवावे का नको असे वाटते.

- दत्तात्रय लोकरे. ऊजनी मा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT