ladki bahin yojana app server down women suffer application pending Sakal
सोलापूर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या ॲपचे सर्वर डाऊन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू केली.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : महायुती सरकारने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठीचे ॲप मध्ये सध्या तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बहुसंख्य महिला अर्ज भरण्यासाठी त्रस्त होत आहेत. सदरचे ॲप कधी सुरू होणार याची विचारणा महिला वर्गातून होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 18 ते 65 वयोगटातील महिलांसाठी मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजना सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात याबाबतच्या अटी मध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे नेमकी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे की सावत्र बहिण आहे असा प्रश्न विचारला जात असताना त्या योजनेसाठी महिलांना नाव नोंदणीसाठी एक स्वतंत्र ॲप सुरू केले आहे,

ते ॲप द्वारे गेले आठवडाभर नोंदणी सुरू असताना सुरुवातीचे काही दिवस ॲपचे सर्वर सातत्याने लोडवर असल्यामुळे चालत नव्हते त्यामुळे बहुसंख्य महिला या अर्ज भरू शकल्या नव्हत्या मात्र गेले चार-पाच दिवसात अर्ज भरण्याची सुविधा अँप वर तातडीने उपलब्ध झाल्यामुळे बहुसंख्य महिलांनी नोंदणी केली. 15 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा हप्ता जमा होणार असल्यामुळे सध्या नोंदणीसाठी महिलांची पळापळ सुरू आहे परंतु आज सकाळपासून सदर मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे ते ॲप ओपन होत नसल्याने महिला आणखीनच त्रस्त झाल्या.

याबाबत प्रयत्न केले असता सर्विस अनअवेलेबल असा संदेश येत आहे शनिवारी रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे नाव नोंदणीच्या प्रतिक्षेत असलेल्या महिला मोबाईलवर सातत्याने ॲप कधी ओपन होणार यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र ॲप मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे नवीन नोंदणी करू शकत नाहीत.

शासनाने ऑफलाइन अर्जाचा व अन्य मार्गाचा पर्याय दिला असला तरी महिलांची ऑनलाईन नोंदणीला अधिक पसंती आहे याबाबतची माहिती शासनाने सदरचा तांत्रिक दोष किती तासापर्यंत आहे याबाबतची माहिती उपलब्ध नसल्यामुळे नेमके ॲप कधी सुरू होणार याच्या प्रत्यक्षेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT