Ladki Bahini Yojana Esakal
सोलापूर

Ladki Bahini Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी अर्ज करण्यास 'या' 15 दिवसांचीच मुदत! ही' कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Ladki Bahini Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. त्यासाठी २१ ते ६० वयोगटातील महिला (वार्षिक अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा) या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून (सोमवारी) प्रारंभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 14 लाख महिला योजनेच्या लाभार्थी होऊ शकतील अशी स्थिती आहे. त्या सर्व महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे. लाभार्थी महिलांना 15 दिवसात कधीही त्यांच्या गावातील महा- इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल.

कोणत्या महिला असणार पात्र?

- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक

- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला

- वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा

- अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक

- अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे

- अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल

- ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

- ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा

- आधार कार्ड आवश्‍यक

- राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला

- बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

- पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड

- योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

- अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक

अर्ज भरण्याची सुविधा

अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया

- अर्ज करण्याची सुरुवात : १ जुलै

- अर्ज करण्याची शेवट तारीख : १५ जुलै

- प्रारूप निवड यादी प्रकाशित : १६ ते २० जुलै

- प्रारूप यादीवर हरकत, तक्रार करणे : २१ ते ३० जुलै

- लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित : १ ऑगस्ट

- लाभ देण्यास सुरुवात : 14 ऑगस्टपासून

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेसाठी उद्यापासून (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर सुनील तटकरे देवगिरीवर दाखल

MLA Hemant Rasne : कसबा विधानसभा नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने कचरा, कोंडीमुक्त मतदारसंघासाठी प्रयत्न

Islampur Results : जयंतराव-निशिकांत पाटलांमध्ये गावागावांत टक्कर; अनेक गावांत जयंतरावांना धक्‍का, कोणाला किती पडली मतं?

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

SCROLL FOR NEXT