File photo
सोलापूर

कोरोना टेस्टिंगसाठी 'सांगोला पॅटर्न' ठरतोय यशस्वी

दत्तात्रय खंडागळे :

रुग्ण वाडीच्या पहिल्या दहा गावांची निवड करून त्या गावात अशा टीम बनवून वार्डनिहाय टेस्टिंग केल्या.

सांगोला (सोलापूर) : शासनाने कोरोना चाचण्या (corona testing) वाढविण्यासाठी आदेश दिला असला तरी नागरिक चाचण्यांसाठी पुढे येत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन सांगोला तालुक्यामध्ये प्रशासनाने टेस्टिंगसाठी एक वेगळा 'सांगोला पॅटर्न' (Sangola Patern) राबविला आहे. यामध्ये तालुक्यातील रुग्णवाढ होत असलेल्या तीस गावांची निवड करून त्या गावांमध्ये चाचण्यांसाठी ग्रामपंचायतींच्या वार्डनिहाय आरोग्य व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची टिम बनवून अशा गावांत मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्टिंग (Corona Testing) केल्या जात आहेत. (large scale corona testing is being done in sangola taluka)

बुधवारी तालुक्यात एकाच दिवशी चार हजार 89 टेस्टिंग केल्या. हॉटस्पॉट गावात रुग्नांना व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधणे सुलभ झाले असून कोरोनाची साखळी तोडण्यासही यामुळे मदत होणार आहे.

दुसऱ्या लाटेमध्ये सांगोला तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती. रुग्णांना उपचारासाठी बेडही मिळत नव्हते. गावोगावी कोरोना टेस्टींग सुरू केले तरी नागरिक टेस्टींगसाठी पुढे येत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन सांगोल्याचे गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी तालुक्यातील रुग्ण वाढ होत असलेल्या प्रामुख्याने तीस गावांची निवड केली. या गावचे, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी तसेच महसूलचे मंडलाधिकारी यांची ऑनलाईन द्वारेच मीटिंग घेतली.

या प्रत्येक टिमसोबत पोलिस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली. अशा गावांत ग्रामपंचायतीच्या वार्डनुसार टेस्टिंग करण्यासाठी टीम बनवल्या. प्रत्येक टीम सोबत टेस्टिंगचे सर्व साहित्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच गावातील सरपंचासह त्या वार्डातील ग्रामपंचायत सदस्यांनाही घरोघरी जाऊन टेस्टिंगसाठी मदत करण्याचे आदेश दिले. रुग्ण वाडीच्या पहिल्या दहा गावांची निवड करून त्या गावात अशा टीम बनवून वार्डनिहाय टेस्टिंग केल्या. बुधवारी पहिल्या दहा गावांमध्ये एकाच दिवशी तालुक्यात चार हजार 89 जणांची कोरोना चाचणी केल्या. यामध्ये 40 जण पॉझिटिव्हही सापडले. या 40 जणांना लगेचच कोविड सेंटरला विलगीकरणात पाठवून तर काहींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.

प्रथमता 30 गावी झाल्यानंतरच पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या इतर गावांमध्येही अशाप्रकारे टीम बनवून टेस्टिंग वाढविल्या जाणार असल्याची माहितीही गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी दिली. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही टेस्टिंग वाढविण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक व्यावसायिकाला व त्यांच्या कर्मचाऱ्यांना टेस्टिंग केल्याशिवाय व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात नाही.

सांगोला पॅटर्नची वैशिष्ट्ये

- रुग्णवाडी नुसार चाचण्यांसाठी गावांची निवड

- टेस्टिंगसाठी ग्रामपंचायत वार्डनिहाय बनविली टीम

- प्रत्येक टीममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना बरोबरच सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना दिली जबाबदारी

- प्रत्येक टीमसोबत पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

- कोरोना रुग्णांच्या संपर्कातील, वयोवृद्ध, को-मॉर्बीड, सर्व व्यवसायिक, दुधवाले यांची प्राधान्याने टेस्टिंग

- शहरातही टेस्टिंगशिवाय कोणालाही व्यवसायाची परवानगी नाही.

- जिल्हा परिषदचे अधिकारी, महसूल, पोलिस, नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचा एकत्रित समन्वय.

"गावांची निवड करून टेस्टिंग वाढविल्याने कोरोना रुग्णांना शोधणे सुलभ होत आहे. वार्डनुसार टेस्टिंगच्या अगोदर संबंधित सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्या गावचे सरपंच व सदस्यांना ऑनलाईन मीटिंग घेण्यात येते. यापुढेही अजून टेस्टिंग वाढविण्यात येणार आहे."

- संतोष राऊत, गट विकास अधिकारी सांगोला.

(large scale corona testing is being done in sangola taluka)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT