लातूर : येथील जिल्ह्यातील सर्वात मोठा दरोडा उघडकीस आणण्यात येथील स्थानिक गुन्हे शाखा व विवेकानंद चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांना दहा दिवसात यश आले आहे. या प्रकरणात चौघाना अटक करुन चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिनेसह रोख रक्कम असे एकूण ७९ लाख १३ हजार ५१३ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी शुक्रवारी (ता. २१) येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील कातपूर शिवारात १२ आक्टोबर रोजी येथील व्यापारी राजकमल अग्रवाल यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. यात दरोडेखोरांनी सव्वादोन कोटी रुपये रोख व ७३ लाख रुपयांचे अडीच किलो दागिणे चोरून नेले होते. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अनुराग जैन व उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व विवेकानंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने हा गुन्हा उघकीस आणला आहे.
याप्रकरणातील संशयित बाभळगाव रस्त्यावरील पांचपीरनगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती पथकाला मिळाली. यात पोलिसांनी छापा टाकून पहिल्यांदा किशोर घनगाव (वय ३८, रा. पांचपीरनगर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने पुणे येथील टक्कूसिंग कल्याणी व त्याच्या साथीदारासोबत मिळून घातक हत्यारांचा धाक दाखवून सदरची चोरी केल्याचे कबूल केले.
त्यानंतर पोलिसांच्या पथकांनी पुढे तपास करीत पुणे येथील टक्कूसिंग अजितसिंग कल्याणी (वय ५०, रामटेकडी, पुणे), बल्लूसिंग अमरसिंग टाक (वय ३०, रा, तीर्थपुरी, तालुका घनसांगवी, जि.जालना), गणेश कोंडीबा अहिरे (वय ३०, रा. बावची, ता. रेणापूर) यांना ताब्यात घेतले. या सर्वांकडून रोख रक्कम ५० लाख रुपये व २९ लाख रुपयांचे ५६ तोळे सोन्या-चांदीचे दागिणे, असा एकूण ७९ लाख १३ हजार ५१३ रुपयांचा माल जप्त केला आहे. यातील टक्कूसिंह हा सराईत गुन्हेगार असून तो २१ वर्ष जैलमध्ये होता. उर्वरित आरोपींचा व मुद्देमालांचा शोध घेण्यात येत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती श्री. जैन यांनी दिली.
या करीता श्री. भातलवंडे व बावकर व पोलिस निरीक्षक (सायबर) अशोक बेले यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक राहुल बहुरे, सचिन द्रोणाचार्य, भाऊसाहेब खंदारे, सूरज गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश गळघट्टे, शैलेश जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र ढगे, पोलिस अमलदार अंगद कोतवाड, राजेंद्र टेकाळे, राम गवारे, रवी गोंदकर, खुर्रम काझी, रामहरी भोसले, प्रकाश भोसले, नवनाथ हासबे, यशपाल कांबळे, राजेश कंचे, माधव बिलापट्टे, सुधीर कोळसुरे सिद्धेश्वर जाधव, योगेश गायकवाड, रियाज सौदागर, संतोष देवडे, प्रदीप स्वामी, गणेश साठे आदींनी पुढाकार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.