सोलापूर

पत्नीचा विहिरीत ढकलून देऊन खून करणाऱ्या पतीस जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पत्नीचा विहिरीत ढकलून देऊन खून केल्यापकरणी पतीला जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. जगताप यांनी शुक्रवारी (ता. 7) ठोठावली. उच्चशिक्षित असलेल्या वैभव कालिदास मगर (रा. खुनेश्‍वर, ता. मोहोळ) याचा 2009 मध्ये नरखेड (ता. मोहोळ) येथील सीमा चंद्रकांत मोटे हिच्याशी विवाह पार पडला. विवाहानंतर चार वर्षे त्यांचा संसार सुखाने सुरु होता. त्यानंतर वैभवने सीमाच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा छळ केला. एकेदिवशी सीमाला नरखेडहून खुनेश्‍वरला घेवून जाताना गावाजवळील विहिरीत ढकलून देवून वैभवने सीमाचा खून केला. या प्रकरणी वैभवला जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 

आरोपी वैभव हा चारित्र्यावर संशय घेवून छळ करीत असल्याची बाब सीमाने आपल्या आई- वडिलांना सातत्याने सांगितली. त्यावेळी सीमाच्या आई- वडिलांनी वैभवला समजावून सांगितले. दरम्यान, 21 ऑगस्ट 2016 मध्ये वैभव सीमाच्या माहेरी नरखेडला आला. सीमाला सुखाने नांदवतो म्हणून दुचाकीवरुन खुनेश्‍वरला घेवून निघाला. तात्या सोपान डोंगरे (रा. खुनेश्‍वर) यांच्या शेतातील विहिरीजवळ दुचाकी येताच वैभवने सीमाला विहिरीत ढकलून दिले. दुचाकी विहिरीत ढकलून देताना तोही विहिरीत पडला आणि जखमी झाला. त्यानंतर सीमाचे वडील चंद्रकांत श्रीरंग मोरे यांनी मोहोळ पोलिसांत जावई वैभव विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

या प्रकरणात आठ साक्षीदार तपासण्यात आले, त्यापैकी दोघांचे भांडण पाहणारे विजयकुमार सिरसट व सीमाच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच वैद्यकीय पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत यांनी न्यायालयासमोर सादर केलेले सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आरोपीला शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचे ठरले. या खटल्यात आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. बी. डी. कट्टे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल एस. एस. धर्मे यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहाचा मोठा निर्णय! नोएल टाटांनी खरेदी केली नवी कंपनी; किती कोटींना झाला करार?

AUS vs PAK 2nd ODI : १९ वर्षानंतर पाकिस्तान जिंकला! विराटकडून धुलाई झालेला गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकला

Amit Shah : समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला : अमित शहा

German Bakery Bombing Case : जर्मन बेकरी बाँबस्फोटातील हिमायत बेग पुन्हा कारागृहात

'स्वतःच्या स्वार्थासाठी कारखाना बंद पाडण्याचं पाप मुश्रीफांनी केलंय'; जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरींचा घणाघात

SCROLL FOR NEXT