Madha Lok Sabha 2024 eSakal
सोलापूर

Madha Lok Sabha 2024 : माढ्यात उमेदवार देण्याची घाई नाही.. शरद पवारांच्या संयमात विजयाची रणनीती!

Sharad Pawar : ज्या मतदारसंघात ‘माढा आणि शरद पवारांना पाडा’ घोषणेचा उगम झाला, आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसत आहे.

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

- प्रमोद बोडके

पक्ष गेला, चिन्ह गेले. मतदारसंघात ज्यांना मोठे केले, ते पण सोडून गेले. एकही आमदार वा माजी आमदार आज सोबत नाही, अशी कागदोपत्री स्थिती माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आहे. ज्या मतदारसंघात ‘माढा आणि शरद पवारांना पाडा’ घोषणेचा उगम झाला, २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नावाबद्दल प्रचंड रोष होत; आज त्याच मतदारसंघात शरद पवारांची तुतारी सामान्यांच्या मुखात दिसत आहे.

माढ्याच्या बाबतीत शरद पवार आजही शांत आणि संयमी भूमिका घेताना दिसत आहेत. येथे गुलाल उधळण्याची संधी आहे पण उमेदवार योग्य पाहिजे, हा जनमानसाचा अंदाज पवारांपर्यंत नक्कीच गेलेला असावा, त्यामुळे माढ्याचा उमेदवार शेवटच्या टप्प्यात निश्‍चित होण्याची शक्यता आहे.

कधी नव्हे ती माढ्यात कमी दिवसात तुतारी भलतीच लोकप्रिय होऊ लागली आहे. भाजपने उमेदवारीत डावलल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांना त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून आता तुतारीचा सल्ला येऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांच्या विरोधात जाऊन तुतारी हाती घेण्याचे धाडस मोहिते-पाटील करणार का? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर अद्यापही मिळताना दिसत नाही. शरद पवारांनी माढ्यासाठी ज्या नावाचा विचार केला होता, ते महादेव जानकर महायुतीत सहभागी झाले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघातील स्वत:ची उमेदवारी असो की २०१४ मध्ये विजयसिंह मोहिते-पाटील व २०१९ मध्ये संजय शिंदे यांची उमेदवारी, उमेदवारी देताना शरद पवार कुठपर्यंत अंत पाहतात, किती जणांचा कशा, कशा पद्धतीने अंत पाहतात? याचा चांगलाच अनुभव मोहिते-पाटील व शिंदे बंधू या दोघांनाही आहे. त्यामुळे माढ्याच्या बाबतीत शरद पवार तुर्तास घाई करण्याची शक्यता कमीच आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सध्या धैर्यशील मोहिते-पाटील व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. उमेदवार हा सोलापूर जिल्ह्यातीलच असणार, हे जवळपास आता स्पष्ट झाले आहे.

ज्या उमेदवारामुळे पक्षाला कमीत कमी फटका बसेल, असाच उमेदवार अंतिम होण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ एप्रिलपासून सुरवात होणार आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी १९ एप्रिलची अंतिम मुदत आहे. जवळपास १७ दिवस आणखी बाकी आहेत, तोपर्यंत माढ्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात कोण, कोण, काय, काय रंग दाखवतात? हे पाहिल्यानंतरच माढ्याचा राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न

माढा जसा शरद पवारांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, तसाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. माढ्याच्या विकासासाठी कधी नव्हे ते फडणवीसांनी खासदार निंबाळकर यांच्यासाठी मोकळा हात सोडला आहे. खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील व रामराजे निंबाळकर यांचा विरोध असल्याचे माहीत असूनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निंबाळकरांची उमेदवारी राज्याच्या पहिल्या यादीत जाहीर केली. माढ्याचा गड काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस माढ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे दिसते. त्यांच्या मदतीला माणचे आमदार जयकुमार गोरे, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसत आहे.

लढाई अस्तित्वाची...

खासदार निंबाळकर पुन्हा माढ्यातून खासदार झाले तर आपले अस्तित्व संपेल, अशी भीती फलटणमध्ये रामराजे निंबाळकर व माळशिरसमध्ये मोहिते-पाटील यांच्या गटाला वाटत आहे. आता संधी नाही तर परत कधीच नाही; त्यामुळे निंबाळकरांच्या उमेदवारीला माळशिरस व फलटणमधील महायुतीतूनच विरोध होत आहे. खासदार निंबाळकर यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, मकाईच्या नेत्या रश्‍मी बागल सक्रिय झाले आहेत. या चौघांमध्ये सहभागी होण्यापेक्षा मी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी इच्छुक असल्याची भूमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी जाहीर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT