Madha Vidhan sabha Election 2024 sakal
सोलापूर

Madha Assembly Election 2024 : तिरंगी लढतीत शिंदे- मोहिते पाटलांची प्रतिष्ठा पणाला

Madha Vidhan Sabha 2024 : माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मीनल साठे यांच्यात तिरंगी‌ लढत होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

माढा विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी व प्रचाराला मोठा वेग आला आहे. दिग्गज नेत्यांच्या सभा व आरोपांच्या फैरी सुरू आहेत. प्रमुख नेत्यांना आपल्या गटात खेचण्याची राजकीय स्पर्धाच लागली आहे.

अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्या प्रचारात त्यांचे वडील आमदार बबनराव शिंदे व प्रा. शिवाजीराव सावंत हेच स्टार प्रचारक म्हणून सक्रिय आहेत. आमदार शिंदे यांनी मागील तीस वर्षांत केलेल्या सिंचन, वीज, रस्ते, ऊस,‌ शिक्षण, आरोग्य शिबिरे यासह इतर विकासकामांचा लेखाजोखा मांडत आहेत.

रणजित शिंदे यांनी निमगावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाचाही लेखाजोखा मांडत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करत आहेत.

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे हे रणजित शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने याचा रणजित शिंदे यांना फायदा होणार आहे.

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील व खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, टेंभुर्णीचे संजय कोकाटे हे त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. अरणच्या भारत शिंदे यांना आपल्या गोटात खेचण्यात अभिजीत पाटील यांना यश आले आहे. पाटील यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपळाई बुद्रुकमध्ये तर खासदार अमोल कोल्हे यांनी करकंबमध्ये प्रचारसभा घेतली आहे. आमदार शिंदे यांनी तीस वर्षांत अपेक्षित विकासकामे केली नसल्याचा आरोप श्री. पाटील हे प्रचारादरम्यान करत आहेत.

विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून जाहीर केलेला ऊस दर व मतदारसंघाच्या विकासासाठी करावयाची कामे याबाबतचे मुद्दे घेत प्रचार करीत आहेत.महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांच्यारुपाने पहिल्यांदाच माढा विधानसभा मतदारसंघात संघात महिलेला संधी मिळाली आहे.

त्यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी टेंभुर्णीत प्रचारसभा घेतली.

साठे घराण्याचा राजकीय वारसा, माढा नगरपंचायतीच्या माध्यमातून निर्माण केलेला माढ्याचा विकास पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात नेण्याचा मानस आहे. आमदार शिंदे यांनी तीस वर्षात केलेल्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. कल्याण काळे, संत कुर्मदास कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, कनिष्का साठे त्यांच्या प्रचारात आहेत. त्यांच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ऐन‌ कसोटीच्या काळात त्यांची साथ सोडली असली तरी भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे पदाधिकारी त्यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

अपक्षांची गर्दी

या मतदारसंघात प्रमुख उमेदवारांबरोबरच अभिजीत आण्णासाहेब पाटील (अपक्ष), अभिजीत तुळशीराम पाटील (अपक्ष), अॅड. तुकाराम बळिराम राऊत (अपक्ष), मयुर अजिनाथ काळे (अपक्ष), महेश बाळू बिस्किटे (अपक्ष), रणजित भैय्या शिंदे (अपक्ष), राजेश तानाजी खरे (अपक्ष), सीताराम विठ्ठल रणदिवे (अपक्ष) यांचाही प्रचार मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात सुरू आहे.

नाम, चिन्ह साधर्म्य

माढा विधानसभेसाठी अभिजीत पाटील नावाचे चार तर रणजित शिंदे नावाचे दोन उमेदवार आहेत. या नाम साधर्म्यमुळे व ट्रम्पेट चिन्हामुळे पडणाऱ्या मतांचा फटका लढतीतील उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Voting: पिपाणीने पुन्हा केला तुतारीचा गेम! वळसे पाटील थोडक्यात वाचले; पवारांच्या ९ बड्या नेत्यांना कसा बसला फटका?

Mobile Charging Tips : कितीही वेळ मोबाईल वापरा चार्जिंग संपणारच नाही, सोपी ट्रिक बघाच

Devendra Fadanvis: ‘महाराष्ट्र नायक’ फडणवीसांनाच मुख्यमंत्री करा, भाजपची जोरदार Lobbying

Utpanna Ekadashi 2024: 26 कि 27 नोव्हेंबर कधी साजरी केली जाणार उत्पन्न एकादशी? जाणून घ्या काय करावे अन् काय नाही

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे आमदारांकडून घेणार प्रतिज्ञापत्र; पुन्हा पक्ष फुटीची भीती

SCROLL FOR NEXT