Madha Lok Sabha 2024 esakal
सोलापूर

Madha Lok Sabha 2024: माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम, शरद पवारांच्या डोक्यात काय?

Madha Lok Sabha 2024: शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. मात्र माढा लोकसभेसाठी अजून तिढा कायम आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या डोक्यात काय प्लॅन आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : माढा लोकसभा निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा बाळदादा मोहिते-पाटील यांनी केली होती. शरद पवारांनी शुक्रवारच्या सातारा दौऱ्यात मोहिते-पाटलांबद्दल सावध भूमिका जाहीर केली. शरद पवारांनी आज जाहीर केलेल्या राज्यातील पाच उमेदवारांमध्ये माढ्याचा उमेदवार नसल्याने माढ्याच्या उमेदवारीचा तिढा पवारांनी कायम ठेवला आहे.

शरद पवारांसमोर माढ्याच्या उमेदवारीचा तिढा आहे की शांत व संयमी भूमिका घेत माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आहे? या बद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतून शरद पवार राज्यातील नऊ जागा लढण्याची शक्यता आहे. त्यापैकी आज बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा आणि नगर या पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. पवारांच्या वाट्याला येणाऱ्या माढा, सातारा, बीड व भिवंडी या चार जागांवरील उमेदवारांचा निर्णय मागे ठेवल्याचे दिसत आहे.

माढ्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील, डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप या चार नावांची चर्चा आहे. सर्वात आघाडीवर धैर्यशील मोहिते-पाटील व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावांचा समावेश आहे. माढा लोकसभेसोबतच साताऱ्याच्याही उमेदवारीचा निर्णय मागे ठेवला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण व फलटण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. त्यामुळे साताऱ्यातील उमेदवार ठरविताना माढ्याचा फायदा, माढा व सातारा असाही संबंध लावला जाण्याची शक्यता आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. माढ्यातून धनगर उमेदवार देऊन त्या सामाजिक समतोलाचा लाभ पश्‍चिम महाराष्ट्रातील इतर मतदार संघातही घेतला जाण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, दुसरा क्लेम आमचाच-

माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घ्यावा? यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर व शेकापचे नेते जयंत पाटील निर्णय घेणार आहेत.

माढ्याच्या बाबतीत पहिला क्लेम धैर्यशील मोहिते-पाटील यांचा आहे, त्यानंतर आमचा शेकापचा व शेकापच्यावतीने डॉ. अनिकेत देशमुख यांचा आहे. आमच्या बैठकीत असेच ठरले असल्याची माहिती शेकापचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच प्रसार माध्यमांना दिली आहे.

भाजपकडून मोहिते-पाटलांची मनधरणी-

जयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा, सोलापूर, सातारा, बारामती येथून भाजपला घालविण्याची उघड भूमिका जाहीर केल्यानंतर भाजप मोहिते-पाटील यांच्या बाबतीत सावध झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे यांच्यासोबत बैठक घेतली.

या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आज अकलूजला पाठविण्यात येणार असल्याची चर्चा होती. आज दिवसभर अकलूजकरांनी मंत्री महाजन यांची वाट पाहिली. महाजन आले नाहीत. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मात्र मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT