Madha Lok Sabha eSakal
सोलापूर

Madha Lok Sabha : महायुती व आघाडीकडून नेत्यांची मनधरणी; माढा मतदारसंघात धनगर समाजाला मोठे महत्त्व

महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू झाले तेव्हा शरद पवार यांनी माढ्याच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती.

सकाळ वृत्तसेवा

- विजय चोरमारे

लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा लढवलेल्या माढा मतदारसंघात मराठा समाजाचे वर्चस्व असले तरी त्याखालोखाल असलेला धनगर समाज निर्णायक भूमिका बजावू शकतो. त्यामुळे निवडणुकीची चर्चा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत धनगर समाज आणि त्यांचे नेतेच चर्चेत आहेत.

महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू झाले तेव्हा शरद पवार यांनी माढ्याच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. जानकर यांच्यामुळे धनगर समाज पक्षासोबत राहील, शिवाय अन्यत्रही त्यांच्या उमेदवारीचा फायदा होईल, असा उद्देश होता. परंतु जानकर यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी पुढे आली. महादेव जानकर महायुतीसोबत गेल्यानंतर माळशिरसमधील उत्तम जानकर आपल्यासोबत राहावेत, यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्यात आले.

त्यांना विशेष विमानाने नागपूरला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नेण्यात आले, तिथून परत आल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला. माळशिरस क्षेत्रात मराठा समाजाखालोखाल धनगर समाजाचे मतदार आहेत. उत्तम जानकर परंपरागत मोहिते-पाटील विरोधक असून त्यांचा २००९च्या विधानसभा निवडणुकीत १६ हजारांनी तर २०१९ मध्ये अवघ्या अडीच हजारांनी पराभव झाला होता.

माळशिरस मतदारसंघात शरद पवार यांना मानणारे सुमारे तीस ते चाळीस हजार मतदार असल्याचे यापूर्वीच्या विधानसभेत दिसून आले आहे. त्यांच्या आणि मोहिते-पाटील यांच्या मदतीशिवाय आमदारकीचा मार्ग मोकळा होत नसल्याचे लक्षात आल्यामुळेच जानकर यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला.

सांगोला मतदारसंघात मराठा आणि धनगर समाजाचे प्रमाण जवळपास सारखे आहे. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे. दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख हे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासोबत अर्ज भरायलाही होते. परंतु त्यांचे धाकटे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले आहे. उत्तम जानकर हाती न लागल्यामुळे फडणवीस यांनी डॉ. अनिकेत यांना बंडखोरीसाठी प्रोत्साहित केले असावे, अशी चर्चा आहे.

करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचे प्राबल्य असले तरी धनगर समाज दखलपात्र आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील या चार विधानसभांव्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा मतदारसंघाच्या क्षेत्रात येतात. पैकी माणमध्ये धनगर समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे.

फलटणमध्ये तुलनेने धनगर समाज कमी आहे. एकूण मतदारसंघात धनगर समाजाचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान आहे. एवढ्या मतपेढीवर धनगर समाजाचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, परंतु निर्णायक भूमिका बजावू शकतो. म्हणून धनगर समाजाच्या नेत्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. महादेव जानकर, उत्तम जानकर, नारायण पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख या नावांना त्याचमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT