Madha Lok Sabha Election Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha Election: सोलापूरच्या राजकारणाची नव्याने मांडणी; धैर्यशील मोहिते-पाटील, प्रणिती शिंदे यांच्या रूपाने नव्या समीकरणाचा उदय

Madha Lok Sabha Election: माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे धैर्यशील मोहिते-पाटील लढण्याची शक्यता आहे. शिंदे व मोहिते-पाटील या घराण्यातील या दोन चेहऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे रुजू लागली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची नव्याने मांडणी होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतर्फे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे लढत आहेत. माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे धैर्यशील मोहिते-पाटील लढण्याची शक्यता आहे. शिंदे व मोहिते-पाटील या घराण्यातील या दोन चेहऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे रुजू लागली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात २००९ पर्यंत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वर्चस्व होते. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा विधानसभेला २००९ मध्ये पंढरपुरातून तर सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभेला २०१४ मध्ये सोलापुरातून पराभव झाला. तेव्हापासून जिल्ह्याच्या सक्रिय राजकारणात ही दोन्ही घरं बाजूला पडली होती. जवळपास दहा वर्षानंतर आता जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे व मोहिते-पाटील एकत्रित येताना दिसत आहे. या दोन्ही परिवारांना पुन्हा एकदा जोडण्यासाठी शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यात आज अकलूजमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी हजेरी लावली. त्यामुळे करमाळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. येत्या काळात माढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यातील महायुतीच्या पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांचाही प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या खेळीकडे लक्ष

पवार, शिंदे, मोहिते-पाटील यांच्या रूपाने जिल्ह्याच्या राजकारणात नव्याने समीकरणे मांडली जात असताना भाजप काय करणार? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी भाजप जिल्ह्यातील मोहिते-पाटील व शिंदे यांच्या विरोधकांना एकत्रित आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर, माढा, धाराशिव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले सातारा, रायगड, व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाचे तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे. या मतदानापूर्वी भाजप सोलापूर जिल्ह्यात मोठी खेळी करण्याची शक्यता आहे.

माळशिरसमध्ये भाजप पडली उघडी?

मोहिते-पाटील परिवाराने भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना एकटे पाडत राष्ठ्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माळशिरसमधील नेते उत्तम जानकर हे देखील काही दिवसांमध्ये मोहिते-पाटील यांच्यासोबत हात मिळवणी करण्याची शक्यता दिसू लागली आहे.

माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेतून भाजपने उमेदवारी दिल्याने ते स्वत:च्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील अशी लढत झाल्यास माळशिरसमध्ये भाजपचे काम करण्यासाठी एकही प्रभावी नेता शिल्लक राहिला नाही. एकेकाळी भरभरून नेते असलेली भाजप आता माळशिरसमध्ये उघडी पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT