Madha Vidhansabha Politics esakal
सोलापूर

Ajit Pawar : राष्ट्रवादीला मोठा धक्का! मुलाच्या उमेदवारीसाठी 'हा' आमदार सोडणार अजित पवारांची साथ?

भारत नागणे

आमदार बबन शिंदे म्हणाले, 'शरद पवार यांची दोन वेळा भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी अद्याप कोणालाच उमेदवारीचा शब्द दिला नाही.'

पंढरपूर : राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे अनेक नेते आणि आमदार शरद पवार (Sharad Pawar) गटाकडे जात असतानाच, आज माढ्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा आमदार शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. आमदार बबनराव शिंदे आज पंढरपुरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. आमदार शिंदे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली होती. दरम्यान, आमदार शिंदे यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली होती. परंतु, माढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. वाढता विरोध पाहता आमदार शिंदे यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार बबन शिंदे म्हणाले, शरद पवार यांची दोन वेळा भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी अद्याप कोणालाच उमेदवारीचा शब्द दिला नाही. शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तर माझा मुलगा रणजितसिंह हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. यातून आमदार शिंदे यांनी शरद पवारांना ही सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांच्या भूमिकेनंतर माढ्याचा महायुतीचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम शेतकरी योजनेचा अठरावा हप्ता मिळण्यास सुरुवात; 2000 खात्यात आले का? लगेच चेक करा

"यांच्यात नक्की काय शिजतंय ?" अंकुश -भाग्यश्रीचे फोटो झाले व्हायरल , कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाची चर्चा

नेता असावा तर असा! कुठल्याही हॉटेलला न जाता राहुल गांधींनी गाठलं थेट टेम्पोचालकाचं कौलारू घर; कोणाची घेतली भेट?

Pune Crime: बोपदेव घाट बलात्कार प्रकरण, संशयित आरोपींचे CCTV फुटेज समोर; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Updates : माजी आमदार सीताराम दळवी यांचे निधन

SCROLL FOR NEXT