Mahaonline service stopped due to server down exasperation from students solapur sakal
सोलापूर

Solapur : सर्वर डाऊन मुळे महाऑनलाईनची सेवा ठप्प, विद्यार्थी व बेरोजगारातून संताप

जून महिन्यातील शैक्षणिक सत्रात पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सुरु असलेली सेवा ठप्प झाल्यामुळे पालकासह विद्यार्थ्यांचे मोठी पळापळ

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : महाऑनलाईन सेवेचा सर्वर डाऊन झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे हजार पेक्षा अधिक दाखले अडकून पडले आहेत शालेय विद्यार्थ्यांना दाखल्यासाठी पालकांसह व विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागत आहे.

जून महिन्यातील शैक्षणिक सत्रात पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सुरु असलेली सेवा ठप्प झाल्यामुळे पालकासह विद्यार्थ्यांचे मोठी पळापळ सुरू झाली आहे.

जून महिन्यात लागणाऱ्या दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक जग विस्तारले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, वैद्यकीय, आयटीआय, व अन्य शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी जून महिन्यात पालक व विद्यार्थाची पळापळ होते.

त्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, नॉन क्रिमिलियर, दाखला,प्रतिज्ञापत्र,जेष्ठ नागरिक दाखल आदी,

दाखल्यांची गरज भासते ही सध्या सेतू सुविधा बंद असल्यामुळे शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून महा-ई-सेवा केंद्र व सीएससी सेंटरचा पर्याय उपलब्ध करून दिला सध्या या केंद्रातून दाखल्यांसाठी पालकाकडून होत असलेली गर्दी व दाखल्यासाठी तात्काळ होत असलेली मागणी लक्षात घेता पालकाकडून ज्यादा शुल्क घेत असल्याची ओरड सुरू झाली.

याकडे महसूल प्रशासन सोयीस्करित्या दुर्लक्ष करीत असतानाच सध्या महाऑनलाईन सेवेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ही सेवा गेले चार-पाच दिवस ठप्प झाली.जवळपास एक हजार पेक्षा अधिक दाखले विद्यार्थ्यांना मिळेनासे झालेले आहेत

ग्रामीण भागातून काही पालक हे सुविधा आता सुरू होईल मग सुरू होईल या आशे पोटी दररोज मंगळवेढ्याला आर्थिक नुकसान सोसून हेलपाटे घालून थकले. परंतु यावर ठोस निर्णय घेतले जात नसल्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमात पडले.

शालेय प्रवेशासाठी उपलब्ध केला असला तरी ऑनलाईन नोकर भरतीसाठी मात्र पर्याय दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

जून महिन्यात शाळांमध्ये प्रवेशाचे दिवस असतात त्यामुळे शासनाने पर्याय व्यवस्था देखील करणे आवश्यक होते. ऐन शाळेत प्रवेशाच्या वेळी सुविधा बंद झाल्यामुळे पालकांची पळापळ सुरू झाली यासाठी मुदतवाढ दिली असली तरी नोकर भरतीसाठी मात्र मुदतवाढ देणार का ? सत्ताधाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नये

- चंद्रशेखर कोडूभैरी ,शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

सर्व्हर डाऊन मुळे दाखल्यासाठी येत असलेल्या अडचणी बाबत वरिष्ठांना त्यांच्या स्तरावरून निपटारा होणेबाबत कळविण्यात आले.

- मदन जाधव तहसीलदार मंगळवेढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT