Maharashtra-Karnataka Border Dispute inconvenienced citizens to go to Karnataka politics sakal
सोलापूर

Maharashtra-Karnataka Border Dispute : असुविधाने त्रस्त नागरिकांची कर्नाटकमध्ये जाण्याची भाषा...

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावापाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील नागरिक गेली अनेक दशके गुण्यागोविंदाने महाराष्टात राहून ईथल्या मातीशी एकरूप झालेले असतानाही महाराष्ट्र व कर्नाटक सीमावादावर पुन्हा चर्चा सुरु झाली असताना महाराष्ट्र सरकार त्यांना मूलभूत सोयीसुविधा देत नाही तसेंच इथल्या लोकांची कोणतीही कामे कितीही हाका मारल्या तरी केल्या जात नाहीत असा आक्षेप घेत उडगी ता. अक्कलकोट येथील गावकरी बांधव या असुविधेला कंटाळून कर्नाटकात जाणे पसंद करीत असल्याचे सांगून कर्नाटकचा ध्वज फडकावीत जयजयकार केला. उडगीचे काही ग्रामस्थ असा रोष व्यक्त करीत असताना जाणकारांचे मत असे बनले कि ज्या महाराष्ट्रात एवढे वर्षे सर्व सोयीसुविधा व लाभ घेतला त्या राज्यात असे करणे योग्य नसल्याचे मत मांडून खरोखरच जर ग्रामस्थ्यांना समस्या सोडवून घ्यायच्या असतील तर योग्य मार्गाने आंदोलन करावे व चळवळ उभी करावे व शासनास आपले प्रश्न पूर्णतः सोडविण्यासाठी भाग पाडावेत अशी जनभावना व्यक्त होत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावापाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत.शुक्रवारी बसस्टँडसमोर ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा देत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केले.कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे.उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम केले जातं आहे.महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना आशा दाखवत ठेवले आहे.शेतकऱ्यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. कर्नाटकात कोणतेही सरकार आले तर शेतकऱ्यांना सोयीसुविधा मिळतात.पण इथे मात्र घसा कोरडे पडेपर्यंत ओरडले तसेंच कितीही रोष व्यक्त केले तरी आश्वासनाव्यतिरिक्त काहीच पदरात पडत नाही याचा रोष सतत व्यक्त होत आहे.नेमके सीमा प्रश्न चर्चेत आले असताना सीमा भागातील नागरिक महाराष्ट्र शासन असुविधा देत असल्याचे कारण देत वेगवेगळ्या प्रकारे रोष व्यक्त करीत आहेत. याचे वेगवेगळे मतमतांतारे निर्माण होत आहेत. एका बाजूला विकास होत नाही अशी ओरड तर दुसऱ्या बाजूस व्यक्त होण्याची पद्धत अयोग्य आहे अशी भावना आहे.सीमा भागातील नागरिक शेती, आरोग्य,दळणवळण, शिक्षण आदी क्षेत्रातील समस्या या खूप मोठ्या आहेत त्यामुळे ते त्रस्त असणे वा रोष व्यक्त करणे साहजिकच आहे पण त्यासाठी राहत असलेल्या राज्याचा तिरस्कार करून त्याचा द्वेष करून दुसऱ्या राज्याचा जयजयकार करणारे कितपत योग्य आहे असा प्रश्न जाणकार व्यक्त करीत आहेत.

पण काहीही झाले तरी नागरिक कंटाळून राग व्यक्त करीत आहेत पण जनभावना तीव्र आहेत याचा विचार करून अधुरी विकास कामे पूर्ण करून दिलासा द्यावे अशी रास्त मागणी मात्र जोर धरत आहे.

सीमा भागातील मुख्य समस्या

1)अक्कलकोट ते उडगी मार्गे बोरोटी पासून बबलाद रस्ता रुंदीकरणांसह नवीन करणे

2)अक्कलकोट ते तडवळ मार्गे कोर्सेगाव पासून बरूर पर्यंत प्रस्तावीत नवीन राष्ट्रीय महामार्ग बनविणे

3)अक्कलकोट ते सलगरपासून सीमाहद्द रस्ता नवीन करणे

3)सीमावर्ती भागातील छोट्या मोठ्या गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे

4)भीमा नदीला वर्षभर सुरळीत पाणी राहील याची काळजी घेणे

5)उजनी धरणातील पाणी टेल एन्डला येईल याचा विचार करून उर्वरित कामे तातडीने हाती घेणे.

6)सीमा भागातील गावात दर्जेदार रस्ते, चांगले बससेवा पूरविणे व निवारा शेड उभे करणे गरजेचे

7)अक्कलकोट बसस्थानक नवीन बांधणे

8)ग्रामीण भागातील बाजारतळे सुधारणे

9)ग्रामीण भागात स्वच्छ पुरेसे पिण्याचे पाणी पुरविणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT