SHARAD PAWAR  SAKAL
सोलापूर

Maharashtra Politics : साहेब नव्यांच्या शोधात, दादा अजूनही जुन्यांच्याच प्रेमात

राष्ट्रवादी काँग्रेस : जिल्ह्यातील प्रभावी युवा नेते शरद पवारांच्या संपर्कात

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याकडे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी केल्यानंतर सोलापूरचे जिल्हाध्यक्षपद पुन्हा एकदा साळुंखे यांच्याकडेच आले आहे. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडविण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नव्याच्या (युवा नेतृत्व) शोधात दिसत आहेत. उपमुख्यमंत्री पवार मात्र आजही जुन्यांच्याच प्रेमात अडकलेले दिसत आहेत.

माजी जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी करत सांगोल्यातून उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद असल्याने त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी बळिराम साठे यांच्यावर सोपविण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वशिल्याने साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदावर पुन्हा येण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांचा हा डाव चाणाक्ष जिल्हाध्यक्ष साठे यांनी हाणून पाडला होता.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीत आता साळुंखे यांना जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. या पदासाठी माळशिरसचे नेते उत्तम जानकर, पंढरपुरातील नेते कल्याणराव काळे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यासह इतर प्रभावी नावे असताना साळुंखे यांना संधी दिली आहे.

कार्याध्यक्षपदी मंगळवेढ्याच्या लतीफ तांबोळी यांचे नाव अंतिम झालेले असताना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करत त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी नेमले आहे. शरद पवारांनी २०२४ ची लोकसभा व विधासनसभा डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील जातीय समिकरणांचा अन् त्यांच्या पाठीशी असलेल्या व्होट बँकेचा अभ्यास करून विजयाचे गणित आखले आहे. माळशिरस, माढा, मोहोळ, करमाळा, सांगोला येथील प्रभावी युवा नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते.

माढ्याच्या दौऱ्याकडे लक्ष

उपमुख्यमंत्री झाल्यापासून अजित पवार एकदाही सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार दुसऱ्यांदा सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी (ता. २३) कापसेवाडी (ता. माढा) येथील द्राक्ष, बेदाणा व दूध उत्पादकांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात नव्याच्या शोधात पवारांनी माढ्याची निवड केल्याने माढा लोकसभा मतदार संघातील राजकीय भूकंपाचा सुरुंग माढा विधानसभेतून तर पेरला जाणार नाही ना? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

जातीच्या समीकरणांना महत्त्व

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सोलापूर शहराध्यक्ष अद्यापही ठरलेला नाही. हा अध्यक्ष ठरविताना पहिल्यांदा जातीच्या निकषांना महत्त्व आले आहे. सोलापुरात निर्णय असलेल्या लिंगायत, तेलुगु भाषिक या प्रमुख समाजातील एकही प्रभावी चेहरा सध्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दिसत नाही. शहराध्यक्ष कोण? यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सोलापुरातील दिशा अन्‌ दिशा अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT