दोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित Sakal
सोलापूर

Solapur News : महावितरणच्या रडारवर थकबाकीदार; दोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित

थकबाकीची रक्कम व नियमानुसार पूनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. थकबाकीची रक्कम व नियमानुसार पूनर्जोडणी शुल्क अधिक जीएसटी घेतल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ४५ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यात आता सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहक महावितरणच्या रडावर आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १४ लाख १६ हजार ३०० ग्राहकांकडे २५४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे.

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ९६ हजार ९१५ ग्राहकांकडे ३१ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या महिन्याभरात सोलापूर जिल्ह्यातील सहा हजार १५४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

आर्थिक अडचणीतील ‘महावितरण’ने थकीत रक्कम किती आहे हे न पाहता आता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे वीजबिल भरावे.

थकबाकी न भरल्यास ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना उकाड्याचा त्रास सोसावा लागणार आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केले आहे.

रूफ टॉप सोलरमुळे वीजबिलापासून मुक्ती

केंद्र सरकारकडून ग्राहकाला एक किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॉटसाठी ६० हजार व तीन किलोवॉटसाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान आहे. ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी.

‘पीएम सूर्यघर’ ॲप मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. एक किलोवॅटच्या रूफ टॉप सोलरमधून दररोज चार युनिट अर्थात दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. महिना १५० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॉटपर्यंतच्या क्षमतेची सोलर सिस्टिम पुरेशी आहे. घराच्या छतावर रूफ टॉप सोलर वीजनिर्मिती प्रकल्प बसवून सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT