सोलापुरात शुक्रवारपासून भरणार 34वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन! Sakal
सोलापूर

Solapur : शुक्रवारपासून भरणार 34वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन!

सोलापुरात शुक्रवारपासून भरणार 34वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलन!

सकाळ वृत्तसेवा

या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे असून, प्रा. डॉ. निनाद शहा यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.

सोलापूर : 34 वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन (34th Maharashtra State Level Pakshimitra Sammelan) डॉ. मेतन फाउंडेशनच्या (Dr. Metan Foundation) वतीने सामाजिक वनीकरण सोलापूर (Social Forestry Solapur) व महाराष्ट्र वन विभाग सोलापूर (Maharashtra Forest Department Solapur) यांच्या सहकार्याने सोलापुरात 7, 8 व 9 जानेवारी 2022 रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह (Dr. Nirmal Kumar Fadkule Hall) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन (Dr. Venkatesh Methan) यांनी दिली. (Maharashtra state level Pakshimitra Sammelan to be held in Solapur from Friday)

या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून सापमार गरुडाची (Short Todd Snake Eagle) निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा माळरान व गवताळ प्रदेश व त्यावरील जैविक विविधता यासाठी समृद्ध असून, या माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. यामधील सापमार गरुड पक्षी या माळरानावरील वैभव म्हणून ओळखला जातो. या संमेलनाची संकल्पना 'माळरान- शिकार पक्षी - संवर्धन' असे ठेवण्यात आली आहे. या संमेलनाच्या अगोदर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पक्षीमित्र संमेलन घेण्यात आले. या उपक्रमातून पक्षी (Birds) हा आपल्या निसर्गातील एक महत्त्वाचा घटक असून त्याचे संरक्षण, संगोपन व संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हा संदेश देण्यात आला. या संमेलना दरम्यान प्रख्यात पक्षीमित्र मारुती चितमपल्ली (Maruti Chitampalli) व बी. एस. कुलकर्णी (B. S. Kulkarni) या दोन व्यक्तींच्या सन्मानार्थ उपक्रम राबविण्यात आले.

सोलापुरातील वनक्षेत्र हे उत्तर 1.8 टक्के असून येथे 357 प्रजातीचे पक्षी आढळतात. यामुळेच सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर आहे, असे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ व पक्षीमित्र सलीम अली (Salim Ali) यांनी म्हटले होते. या संमेलनामध्ये पक्षी निरीक्षण भ्रमंतीसाठी हिप्परगा तलावाची भ्रमंती, सिद्धेश्वर वनविहाराची भ्रमंती व माळरानावर भ्रमंती आयोजित करण्यात आली आहे.

शुक्रवारी, 7 जानेवारी रोजी पक्षीमित्रांसाठी दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये जखमी पक्ष्यांची निगा कशी राखावी व फोटो एडिटिंग (Photo Editing) या विषयांवर कार्यशाळा आयोजित केली आहे. 8 व 9 जानेवारी रोजी पक्षी या विषयावर व्याख्याने, शोधनिबंध, मुलाखत आणि चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनात महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा उद्देश साध्य करून सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन आहे, हा संदेश देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पक्षीमित्र राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर (Dr. Jayant Wadatkar), धैर्यशील पाटील ()Dhairyashil Patil) (उपसंरक्षक, महाराष्ट्र वन विभाग, सोलापूर), मनीषा पाटील (Manisha Patil) (विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण, सोलापूर) यांची मोलाची साथ, सहयोग व मार्गदर्शन मिळत आहे. तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेकडून सहकार्य व योग्य मार्गदर्शन मिळत आहे. सध्याच्या कोरोनाच्या (Covid-19) काळातील सरकारने सूचित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हे संमेलन पार पाडले जाईल, असे मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT