तापले माळशिरसचे राजकीय वातावरण! एकूण मतदान 19244; मतदार याद्यांमुळे गोंधळ esakal
सोलापूर

तापले माळशिरसचे राजकीय वातावरण! मतदार याद्यांमुळे गोंधळ

तापले माळशिरसचे राजकीय वातावरण! एकूण मतदान 19244; मतदार याद्यांमुळे गोंधळ

गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस नगरपंचायतीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

माळशिरस (सोलापूर) : माळशिरस (Malshiras) नगरपंचायतीची दुसरी पंचवार्षिक निवडणूक (Election) जाहीर झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरू झाली असून निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे जमवाजमव चालू झाली आहे. एकूण 17 प्रभागात अनेक इच्छुक आपले नशीब आजमावणार आहेत. या निवडणुकीसाठी महिला मतदार (Voters List) 9010 व पुरुष मतदार 8234 असे एकूण 17 हजार 244 मतदार आपल्या प्रभागातील नगरसेवक नगरपंचायतीमध्ये पाठविणार आहेत. 17 प्रभागांपैकी प्रभाग दोनमध्ये सर्वात जास्त 1216 मतदार आहेत. तर सर्वात कमी प्रभाग सात मध्ये 815 मतदार आहेत.

गेले वर्षभर कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला. कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये प्रभाग आरक्षण काढण्यात आले होते. त्यावेळेला आता लवकरच निवडणुकीची घोषणा होईल, अशी शक्‍यता असताना पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढल्याने नगरपंचायतीची निवडणूक पुढे गेली. त्यानंतर पुन्हा 15 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा प्रभाग आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर मात्र 24 रोजी नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली.

माळशिरस नगरपंचायतीची मुदत मे 2021 मध्ये संपल्यानंतर नगरपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाली होती. मुदत संपल्यानंतर दुसऱ्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक आपण निवडणूक लढविणाऱ्या प्रभागात कामाला लागले. त्यात काही नवीन इच्छुक तर काही विद्यमान नगरसेवक निवडणुकीच्या तयारीसाठी प्रभागात संपर्क ठेवून होते. परंतु, निवडणूक सहा महिने पुढे गेली. तरीही अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागामध्ये विविध उपक्रम राबवत संपर्क ठेवला आहे. माळशिरस नगरपंचायतीसाठी दुसऱ्या आरक्षणांत अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण व नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असणार आहे. सर्वच उमेदवारांकडून आपल्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचार करणे सोपे जाणार आहे.

माळशिरस नगरपंचायतीच्या ज्या मतदार प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात अनेक मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट झाली आहेत. 2016 च्या निवडणुकीत ज्या मतदारांची नावे ज्या प्रभागात होती, त्यांची नावे आता दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट झाल्याने मतदारांसह उमेदवारही गोंधळून गेले आहेत.

प्रभागनिहाय मतदार...

प्रभाग 1 (पुरुष 534, स्त्री 495, एकूण 1029), प्रभाग 2 (पुरुष 651, स्त्री 565, एकूण 1216), प्रभाग 3 (पुरुष 549, स्त्री 494, एकूण 1043), प्रभाग 4 (पुरुष 524, स्त्री 479, एकूण 1003), प्रभाग 5 (पुरुष 508, स्त्री 514, एकूण 1022), प्रभाग 6 (पुरुष 555, स्त्री 507, एकूण 1062), प्रभाग 7 (पुरुष 455, स्त्री 411 एकूण 866), प्रभाग 8 (पुरुष 442, स्त्री 373, एकूण 815), प्रभाग 9 (पुरुष 460, स्त्री 448, एकूण 908), प्रभाग 10 (पुरुष 583, स्त्री 547, एकूण 1130), प्रभाग 11 (पुरुष 581, स्त्री 547, एकूण 1129), प्रभाग 12 (पुरुष 505, स्त्री 464, एकूण 969), प्रभाग 13 (पुरुष 540, स्त्री 481, एकूण 1021), प्रभाग 14 (पुरुष 626, स्त्री 581, एकूण 1207), प्रभाग 15 (पुरुष 532, स्त्री 453, एकूण 985), प्रभाग 16 (पुरुष 541, स्त्री 444, एकूण 985), प्रभाग 17 (पुरुष 424, स्त्री 427, एकूण 851) असे 17 हजार 244 मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT