जाळ्यात सापडलेला 'तो' साधारण साप नव्हे तर..! Sakal
सोलापूर

जाळ्यात सापडलेला 'तो' साधारण साप नव्हे, तर..!

जाळ्यात सापडलेला 'तो' साधारण साप नव्हे तर..! युवकांनी दिले वनविभागाच्या ताब्यात

अशपाक बागवान

जाळीत अडकलेल्या सापाला दोन तोंड असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे हा सर्वसामान्य साप नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

बेगमपूर (सोलापूर) : स्नानगृहाच्या बाहेरून पाइपला लावण्यात आलेल्या मासे पकडण्याच्या जाळीत असलेला 'तो' साप नव्हे तर 'मांडूळ' (Mandul) असल्याचे समजताच क्षणाचाही विलंब न करता 'त्या' युवकाने पोलिसांना खबर दिली अन्‌ दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मांडूळ जातीच्या या वन्यजीवाला वनविभागाच्या ताब्यात सोपविले. सागर पंडित गवळी व राजू शिलेदार (रा. बेगमपूर) असे या युवकांची नावे आहेत. एकीकडे लाखोंच्या किमतीत होत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी (Smuggling) तर दुसरीकडे बेगमपुरातील (Begumpur) या युवकांनी मांडूळाविषयी दाखवलेली भूतदया परिसरात चर्चेचा विषय ठरली.

बेगमपूर (ता. मोहोळ) येथे अरबळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच राजू रामचंद्र शिलेदार, सागर पंडित गवळी हे शेजारी राहतात. शिलेदार यांनी स्नानगृहाच्या पाइपमधून बाहेरून अन्य जीव येऊ नयेत यासाठी पाइपच्या तोंडाला मासे पकडण्याची नायलॉन जाळी लावली आहे. सोमवारी सकाळी राजू यांच्या पत्नी संगीता यांना सदर जाळीत साप असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ आपल्या पतीला याची कल्पना दिली. यावेळी जवळच असलेल्या सागर गवळी यांनाही हा प्रकार समजला. यावेळी राजू व सागर यांनी अलगदरीत्या मोठ्या धाडसाने नॉयलॉन जाळी बाहेर ओढून काढली. यावेळी या जाळीत अडकलेल्या सापाला दोन तोंड असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे हा सर्वसामान्य साप नसून दुर्मिळ मांडूळ आहे, हे दोघांच्याही लक्षात आले. तोपर्यंत घरासमोर गर्दी जमली.

यावेळी काहींनी आर्थिक कमाईच्या दृष्टीने वेगवेगळे सल्ले दिले, परंतु याकडे दुर्लक्ष करत सागर याने तत्काळ तौसिफ बागवान या मित्राकडून कामती पोलिसांना याची माहिती दिली. कामती पोलिसांनी या प्रकाराची खातरजमा करत मोहोळ वनविभागाला याबाबत कळविले. दरम्यान, सागर गवळी व राजू शिलेदार यांनी जाळीत अडकलेल्या मांडुळाला इजा होऊ नये याची दक्षता घेतली. काही वेळातच वनरक्षक सुनील थोरात, वनसेवक लालू पवार घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सागर गवळी, राजू शिलेदार, तौसिफ बागवान, ब्रह्मदेव मोरे, रणजित मोरे, मुस्तफा मणेरी, सरताज पटेल, कुंडलिक भोई, सूरज पटेल, विजय खरात आदींच्या उपस्थितीत सदर मांडूळ ताब्यात घेतले.

मोहोळ येथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या मांडुळाची वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश उटगे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी ज्ञानेश्वर साळुंखे यांच्या उपस्थितीत सदर मांडूळ नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. गावातील युवकाने दाखविलेली भूतदया व प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे एका दुर्मिळ वन्यजीवाला जीवदान मिळाले. लाखोंच्या किमतीत तस्करी होणाऱ्या या प्राण्याची सुटका करून सागर गवळी व राजू शिलेदार यांनी केलेल्या या कार्याची प्रशासनाकडून योग्य दखल घेतल्यास अनेक वन्यजीवांचे नक्कीच संरक्षण होईल, अशी अपेक्षा प्राणीमित्रांकडून व्यक्त केली जात आहे.

सागर गवळी व राजू शिलेदार यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच एका दुर्मिळ प्राण्याला जीवदान मिळाले. त्यांच्या या कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल.

- ज्ञानेश्वर साळुंखे, वन परिमंडळ अधिकारी

कामती पोलिस ठाण्याअंतर्गत प्रथमच घडलेल्या या प्रकारात बेगमपूरच्या युवकांनी प्रामाणिक हेतूने दाखविलेली तत्परता कौतुकास्पद आहे. भविष्यातही नागरिकांनी वन्य जीवांच्या रक्षणासाठी जागरूक राहावे.

- अंकुश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक, कामती पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election 2024 : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT