Ajit Pawar Group esakal
सोलापूर

NCP Crisis : राष्ट्रवादीचा नाराज गट अजित पवारांच्या लागला गळाला? शरद पवारांच्या दौऱ्यात नाराजी उघड

पदाधिकारी निवडीवरून शरद पवार यांच्या मंगळवेढा दौऱ्यात नाराजी उघड

सकाळ डिजिटल टीम

लतीफ तांबोळी व रामेश्वर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे यापूर्वीच समर्थन केले.

मंगळवेढा : पदाधिकारी निवडीवरून गतवर्षी झालेल्या राष्ट्रवादीतील गटबाजीतून नाराज झालेला गट सध्या सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास आगामी काळात या गटाची भूमिका तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष निवडताना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवेढ्यातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याच्या कारणावरून मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत बंड झाले. त्यामध्ये अनेकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

परंतु, सध्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यापासून फारकत घेत सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटात सहभागी होत उपमुख्यमंत्रिपद मिळवले. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गत आठवड्यामध्ये मंगळवेढा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला.

मात्र, सत्काराच्या निमित्ताने तीन ठिकाणी वेगवेगळे सत्कार झाल्यामुळे अजून राष्ट्रवादीतील गटबाजी संपली नसल्याचे दिसून आले. असे असले तरी पदाधिकारी निवडीवरून नाराज झालेला राष्ट्रवादीचा एक गट मात्र त्यावेळी अलगद बाजूला होता.

आगामी नगरपालिका निवडणुका लक्षात घेता शहरामध्ये आपले राजकीय बस्तान मजबूत करण्याच्या दृष्टीने आज नाराज गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शहरातील लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामाची माहिती दिली व पुतळा सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत शब्द घेतला.

याचबरोबर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची जाणीव उपमुख्यमंत्र्यांना करून देताना तालुक्यातील राजकीय परिस्थितीची देखील जाणीव करून दिली. अजित जगताप, प्रवीण खवतोडे, बशीर बागवान, ज्ञानेश्वर भगरे, पांडुरंग ताड, प्रकाश गायकवाड, राहुल सावंजी, सोमनाथ बुरजे, संभाजी घुले आदी यावेळी उपस्थित होते.

आगामी निवडणुकांत दिसतील परिणाम

लतीफ तांबोळी व रामेश्वर मासाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेचे यापूर्वीच समर्थन केले. परंतु, त्यांना कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठबळ दिले नव्हते. त्यामुळे अजित पवार यांचा गट मंगळवेढ्यात कुमकुवत होता. परंतु, अजित पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या नाराज गटाने उपस्थिती लावली. हा गट अजित पवारांच्या गटाला मिळाल्यास त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत दिसू शकतील.

त्यामुळे हा नाराज गट आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्तेचा लाभ घेत शहरामध्ये व तालुक्याच्या विकासामध्ये कोट्यवधींचा निधी उपलब्ध करू शकेल, अशी परिस्थिती आजमितीला आहे. त्यामुळे आगामी काळात हा गट विधानसभा निवडणुकीत कोणाला समर्थन देणार, हे देखील पाहणे निर्णायक ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT