Supriya Sule sakal
सोलापूर

Solapur Assembly Election 2024 : भाजप सरकारकडून शेतकरी अन्‌ जनतेची लूट : सुप्रिया सुळे

Mangalvedha Vidhan Sabha Election 2024 ; मविआ सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव, त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सावंतांची प्रचारसभा

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : भाजप सरकारच्या काळात पाण्याची बाटली वीस रुपयाला व दुधाला २४ रुपये भाव हा कसला अन्याय आहे? सरकार शेतकरी अन्‌ जनतेची लूट करत आहे. मविआ सरकार शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला हमीभाव, त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवव्याख्याते श्रीमंत कोकाटे, प्रांतिक सदस्य राहुल शहा, वसंत देशमुख, दत्तात्रय भोसले, फिरोज मुलाणी, मुजफ्फर काझी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, दादा गरंडे, राजाभाऊ चेळेकर, पांडुरंग जावळे, माणिक गुंगे, अण्णा शिरसट, संगीता कट्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, हा देश कुणाच्या मर्जीने चालत नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर चालत आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे महागाई वाढू देणार नसून महिलांसाठी अनेक योजना राबवणार आहे.

शिवाय मंत्रालय २४ तास जनतेसाठी खुले राहणार. आम्ही सत्तेसाठी मतं मागत नसून शेतकरी, बेरोजगार, महिलांच्या भविष्यासाठी मत मागत आहोत. बेरोजगारी, महागाई कमी करून महिलांना महिन्याला तीन हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे म्हणाले, मी पालकमंत्री असताना छावणी चालकांचे पैसे घरपोच झाले होते. यांच्या काळात छावणी चालकांची मोठी पिळवणूक झाली.

उमेदवार अनिल सावंत म्हणाले, साखर कारखान्यातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम दिले. शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देत वेळेवर बिले दिली आहेत. भविष्यात शिक्षणासाठी मोठे शैक्षणिक संकुल तर बचत गटातील महिलांना घरगुती काम मिळवून देणार आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT