मंगळवेढा - मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील 31 पोलीस पाटलांच्या रिक्त पदासाठी येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी. आर. माळी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यामध्ये भावी पोलीस पाटील होण्यासाठी अनेकजण या सोडतीच्या वेळी उपस्थित होते, परंतु त्या प्रवर्गाचे आरक्षण न निघाल्याने त्यांची मात्र निराशा झाली.
सांगोला 12 व मंगळवेढा 19 अशा 31 रिक्त पोलीस पाटील भरतीची आरक्षण सोडत तहसिल कार्यालय, मंगळवेढा येथे केली. तत्पूर्वी या सोडतीवर आलेल्या हरकती निर्गती करून लोकसंख्येप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली.
एस. सी, व एन टी. सी. चे पद जास्त असल्याने या प्रवर्गाची सोडत काढण्यात आली नाही. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, तहसीलदार मदन जाधव, प्र. तहसीलदार किशोर बडवे, नायब तहसीलदार पी. व्ही. सगर, कनिष्ठ प्रशासनाधिकारी रामलिंग सरवदे, पंकज राठोड, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम धोपटे, समाज कल्याण प्रतिनिधी गुरुदेव स्वामी आदीसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
31 जागामधील नऊ जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या तर ज्या जागेसाठी काढण्याची वेळ आली. ती चिठ्ठी आराध्या जयंत नागणे या लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आली. आजच्या आरक्षण सोडतीमध्ये मंगळवेढ्याचे आरक्षण सोडत काढली असली तरी मंगळवेढ्यात पोलीस स्टेशन असल्यामुळे कदाचित इथली जागा भरली जाणार नसल्याचे संकेत यावेळी दिले.
गावनिहाय प्रवर्ग व आरक्षण पुढीलप्रमाणे
अनुसूचित जमाती पुरूष
तामदर्डी, डोणज, मुढवी (मंगळवेढा)
वाकी (शिवणे), खिलारवाडी, चिणके (सांगोला)
अनुसूचित जमाती महिला
हुन्नुर, बठाण,मंगळवेढा,
भटक्या जमाती 'ब' पुरूष
मानेवाडी, गणेशवाडी, कचरेवाडी (मंगळवेढा)
भटक्या जमाती 'ब' महिला
पाठखळ
विशेष मागास प्रवर्ग
भोपसेवाडी, अकोला, शिवणे (सांगोला)
विशेष मागास प्रवर्ग महिला
मुंढेवाडी
इतर मागासवर्गीय
पौट, रहाटेवाडी (मंगळवेढा), सरगरवाडी, वझरे, आगलावेवाडी, गावडेवाडी, (सांगोला)
इतर मागासवर्गीय महिला
जालीहाळ, कर्जाळ, माळेवाडी (मंगळवेढा)
आर्थीक मागास प्रवर्ग
जुनोनी (मंगळवेढा)
भटक्या जमाती 'ड'
मेटकरवाडी (मंगळवेढा), कारंडेवाडी, मिसाळवाडी
भटक्या जमाती 'ड' महिला
यलमार, मंगेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.