Mangalwedha sakal
सोलापूर

Mangalwedha : स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या जीवावर घेतोय; भगीरथ भालके

भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

हुकूम मुलाणी: सकाळ वृत्तसेवा

Mangalwedha - स्व भारत नानाच्या जाण्याने कुटुंबाचं व मतदासंघाचे छत्र हरपलं होतं अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली धरायचं सोडून पक्षाने वेगळी दिशा दाखवण्याचे काम केल्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या जीवावर घेत असल्याचे प्रतिपादन भगीरथ भालके यांनी व्यक्त केले

भविष्यातील राजकीय वाटचाली संदर्भात येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात,संचालक मुरलीधर दत्तू,दयानंद सोनगे,बसवराज पाटील,भारत बेदरे,रामभाऊ वाकडे,ज्ञानेश्वर भगरे,भारत नागणे,दादा पवार,नितीन पाटील,महादेव फराटे,दत्तात्रय कांबळे,गुलाब थोरबोले,काका डोंगरे,संदीप फडतरे,आदीसह भालके समर्थक उपस्थित होते.

यावेळी बोलताना भालके म्हणाले की,सुरूवातीच्या काळात रिडालोस बद्दल राज्य कर्त्याच्या ज्या भावना होत्या.त्याच भावना आज आहेत पण ज्या मतदारांनी 38 हजाराचे मताधिक्य देत विधानसभेत पाठवले,कागदावर नसलेले 2 टी एम सी पाणी प्रत्यक्षात कागदावर आणले. पाण्यासाठी तीन महिने मतदार व कुटुंबापासून दूर जात बहिणीच्या अंत्यविधीला न येता पाण्याला मंजूरी आणली.

पण सत्ता बदलानंतर पाणी आणि गावे कमी केली पण न्यायालयात दाद मागितली,महाविकास आघाडी सरकारकडून कमी केलेले पाणी व गावे पुर्ववत केले.माझ्यावर अचानक आलेली जबाबदारी पार पाडताना अनेक समस्या आल्या. स्व.नाना कोणत्याही पक्षात असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यावर श्रध्दा ठेवली.

राष्ट्रवादीच्या नेत्यावर जिल्ह्यात कुणीही विरोधी भूमिका मांडल्यास पहिल्यांदा त्यावर प्रत्युत्तर देण्याचे काम स्व. नानानी केले.पण अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याकडून आधार,आपुलकी आणि प्रेमाची गरज होती.प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याला मदत मागितली पण ही मंडळी मदत करू शकली नाही.

एम एस सी बॅकेचा प्रमुख सरकारचा ऐकत नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी माझ्याशी सातत्याने संपर्कात राहून आधार देण्याचे काम केले त्यामुळे आगामी काळात ग्रामपंचायत, नगरपालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहे या ताकदी नंतरच मी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि हे मी मोकळे बोलत नाही ते तुम्हाला त्या निवडणुकीत दिसून येईल.

माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटील म्हणाले की,जो निर्णय घेतला तो विचारपूर्वक घ्या,लाभ घेणाऱ्यांना लांब ठेवून प्रामाणिक कार्यकर्त्याला सोबत ठेवा,गुलाब थोरबोले म्हणाले की,ग्रामपंचायत व नगरपालिका स्तरावरील अडचणी लक्षात घेताना विधानसभा निवडणूक समोर काम न करता ज्या पक्षात जाणार आहे त्या पक्षाने ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणूक लढविणे महत्त्वाचे आहे.

स्व.भालके नसल्यामुळे आम्हाला काम करताना अनेक अडचणी आल्या,नवा पक्ष नवे चिन्हे असले तरी मतदार शोधूनच मत टाकतात, सिध्देश्‍वर दसाडे म्हणाले की, शेतकऱ्यांवर राज्य चालवूनही शेतकऱ्यालाच वंचित ठेवल्याने तुम्ही घेतलेला झेंडा पुढे नेऊ,मनोहर कवचाळे म्हणाले की ,येणारी निवडणूक आर या पार ची असल्याने दिवसा एकीकडे रात्री एकीकडे असं न करता दक्ष राहण्याची गरज आहे.ज्ञानेश्वर भगरे म्हणाले आता पर्यंत मंगळवेढ्यात सगळ्या पक्षाचे बघितले,सगळीकडे पळसाला पाने तीनच आहेत,शेतकऱ्यांचे सरकार म्हणून एकदा नवा पर्याय बघूया,

प्रास्ताविकात माजी सभापती संभाजी गावकरे म्हणाले की,भारतनाना आणि जनता अतूट नाते निर्माण झाले. 35 गाव पाण्यासाठी व विठ्ठल कारखान्याच्या कामासाठी कोरीना काळात झटत असताना ते आपल्यातून निघून गेले.तीन वेळा तीन पक्षातून हॅटट्रिक करणारा पहिला आमदार होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT