सोलापूर

शिरवळ दरोड्यातील गुन्हेगार लवकरच जेरबंद : लोहिया

या दरोड्याची कार्यपद्धती पाहिली असता ते सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले.

चेतन जाधव

या दरोड्याची कार्यपद्धती पाहिली असता ते सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले.

अक्कलकोट (सोलापूर) : तालुक्‍यातील शिरवळ या गावी पडलेल्या धाडसी दरोड्यातील गुन्हेगार हे जवळचे, रेकी केलेले किंवा जवळपासच्या परिसरातील असण्याची शक्‍यता असून लवकरच हा गुन्हा उघडकीस आणून गुन्हेगारांना पकडले जाईल, असे सांगून दरोडा घातलेले गुन्हेगार हे सराईत, रेकॉर्डवरील असण्याची शक्‍यता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

तालुक्‍यातील शिरवळ या गावी दरोडा पडलेल्या घटनास्थळास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी भेट दिली व माहिती घेतली. याप्रसंगी अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहाय्यक पोलिस निरीक्षक भावीकट्टी, एपीआय देवेंद्र राठोड, विपीन सुरवसे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक लोहिया म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याने गुन्हा प्रतिबंधकमध्ये मोठी काळजी घेतलेली आहे. हा गुन्हा प्रतिबंध करण्यासारखा होता किंवा नाही यासाठी पोलिस स्टेशनचे सर्व रेकॉर्डची तपासणी केली आहे. गावागावात सायरणची सोय करण्यात आली आहे. शहरात सीसीटीव्ही तसेच पेट्रोलिंग योग्य तऱ्हेने सुरू असल्याचे आढळून आल्याचे सांगितले.

शिरवळचा दरोडा अल्प कालावधीत दोन ठिकाणी घालण्यात आला. यावरून या गुन्ह्यातील गुन्हेगार हे जवळचे किंवा रेकी केलेले असण्याची शक्‍यता असून त्यांनी गावातील सीसीटीव्हीचा रस्ता टाळलेला दिसून येत आहे. या दरोड्याची कार्यपद्धती पाहिली असता ते सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले. तपास अधिकारी व शोध पथकास त्यांनी सूचना केल्या.

तपासासाठी दोन पथके रवाना

अक्कलकोट तालुक्‍यातील शिरवळ गावात धाडसी दरोडा, सुमारे सव्वा सहा लाख लुटले आहेत. या गुन्हेगारांच्या शोधासाठी दोन पथक रवाना झाली आहेत. सहा दरोडेखोरांनी दोन घरात प्रवेश करून घरातील सदस्यांना मारहाण करून दोन्ही घरातील 17 तोळे सोने व 1 लाख 40 हजाराची रोकड असा सुमारे 6 लाख 36 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. या धाडसी दरोड्यामुळे शिरवळसह वागदरी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या तपासासाठी दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात ते चोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT