Marapur Sarpanch Ashadhi Ekadashi Pandharpur wari esakal
सोलापूर

Ashadhi Ekadashi : आवताडेंच्या आमदारकीसाठी 47 जणांची मारापूर ते पंढरपूर पायी वारी; विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी कार्यकर्ते रवाना

2021 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आ. आवताडे विजयी झाले, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते.

हुकूम मुलाणी ​

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासमवेत भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल मध्यस्थी केली.

मंगळवेढा : दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांना पुन्हा संधी मिळावी, यासाठी तालुक्यातील मारापूरचे सरपंच विनायक यादव यांच्या नेतृत्वाखाली 47 जणांनी मारापूर ते पंढरपूर पायी वारीतून चालत विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी रवाना झाले.

2021 साली झालेल्या पोटनिवडणुकीत आ. आवताडे विजयी झाले, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. सुरुवातीच्या काळात विकासकामे करताना अडचण होत्या. मात्र, नाट्यमयरित्या राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात विकास निधी मोठ्या प्रमाणात आणण्यास सुरुवात केली. त्यामध्ये रस्त्याला सर्वाधिक निधी उपलब्ध केला.

त्याचवेळी कोरोना काळातील आरोग्य सुविधा उणिव ओळखून निंबोणी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. तर, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवून त्याचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करून त्यासाठी थेट निधी उपलब्ध केला. चोकोबा स्मारकासाठी 25 कोटीचा आराखडा स्वतः हजर राहून करून शासनाला सादर केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासमवेत भेट घडवून हा प्रश्न मार्गी लावण्याबद्दल मध्यस्थी केली.

औद्योगिक वसाहत करण्यासाठी त्यांचा पाठपुरावा देखील सुरूच आहे. बंद पडलेला फॅबटेक कारखाना सुरू करत बेरोजगाराच्या हाताला काम देत बंद कामगाराची रोजीरोटी सुरू केली. कार्यालय नसलेल्या 32 ग्रामपंचायतीला कार्यालयासाठी निधी उपलब्ध केला. बहुचर्चित प्रलंबित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देखील त्यांनी मिळवली. सध्याच्या पावसाळी अधिवेशनात त्यांच्यावर पहिल्यांदाच तालिका सभापती पदाची जबाबदारी आल्यानंतर थेट अधिवेशनात सभापती पदाचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पाडत आपले कर्तृत्व सिद्ध केले.

कमी काळात मिळालेल्या संधीचे सोने केले. या पुढील काळात देखील त्यांना संधी मिळाली, तर मतदारसंघातील अपूर्ण कामे मार्गी लागतील व मतदारासंघाला एक दिशा मिळेल म्हणून आम्ही पायी वारी करत पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी निघालो.

-विनायक यादव, सरपंच मारापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unsold Player IPL Mega Auction 2025: अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर यांना फ्रँचायझींनी दाखवला 'ठेंगा'; मुंबईच्या खेळाडूचं नेमकं काय चुकलं?

IPL 2025 Auction Live: फाफ डू प्लेसिससाठी CSK-RCB आले नाहीत पुढे, तर सॅम करनला थालाच्या टीमनं स्वस्तात केलं खरेदी

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंची सारवासारव! थेट गृहमंत्री पदाची केली मागणी, म्हणाले...

MLA Siddharth Shirole : शिवाजीनगर विधानसभा नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा विकासाचा अजेंडा

Earth Axis Tilt : धक्कादायक! पृथ्वी ३१.५ इंचांनी झुकली..भारत ठरतोय कारणीभूत, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT