Maratha Andolan Victory mangalvedha sakal
सोलापूर

Maratha Andolan Victory : मराठा समाजाच्या मागण्या मान्य; मंगळवेढ्यात जल्लोष!

हुकूम मुलाणी

Maratha Andolan: सकल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी ते मुंबई या दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे मंगळवेढ्यातील दामाजी चौकात फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली.

सकल मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वच पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र सत्तेवर येताच आरक्षणाच्या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे या समाजाला अखेर रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही मागणी मागणी सुरुवात केल्यापासून अंतरवाली सराटी येथे झालेल्या पोलीस लाठीहल्यानंतर मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन, मुंडन आंदोलन सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, एसटी वरील एसटी बस वरील सरकारी जाहिरातीवरील राजकीय नेत्यांना काळे फसणे या वेगवेगळ्या माध्यमातून मंगळवेढ्यात आंदोलन करत सरकारला आपल्या भावनांची तीव्रता दाखवण्यात मंगळवेढ्यातील सकल मराठा बांधव यशस्वी ठरले होते.

आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यान आंदोलनामध्ये रांजणगाव ते लोणावळा यादरम्यान संदीप फडतरे,अजित घुले, विनायक हजारे, प्रदीप घुले, लखन माने, प्रकाश मुळीक,संतोष नागणे,त्यांच्यासह भाळवणी येथील आशुतोष वाडेकर सहभागी झाले तर डोंगरगाव येथील मदन पाटील हे डोंगरगाव ते मुंबई दुचाकीवरून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्गस्थ झाले,मरवडे,आंधळगाव,मारापूर,भोसे येथील बांधव सहभागी झाले.

आज पहाटेच्या दरम्यान या मागण्या मान्य झाल्यामुळे आज सकाळी दामाजी चौकात फटाके फोडण्यात आले व मराठा बांधवांनी गुलाल उधळला व शहरातून हलग्याच्या आवाजात मिरवणूक काढत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा जयजयकार करण्यात आला. ग्रामीण भागामध्ये भाळवणी, आंधळगाव, डोंगरगाव, मरवडे, बोराळे, मारापुर, ब्रह्मपुरी,सलगर,खोमनाळ, या ठिकाणी देखील फटाके उडवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT