maratha reservation case in winter session mla praniti shinde solapur politics Sakal
सोलापूर

Solapur News : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय लावून धरू; आमदार प्रणिती शिंदे

मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा शहर व तालुक्यातील 82 गावाच्या वतीने 24 दिवसाचे साखळी उपोषण सुरू

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी भावना तीव्र आहे त्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न लावून धरू प्रसंगी सभागृह चालू देणार नसल्याची ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.

मंगळवेढा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवेढा शहर व तालुक्यातील 82 गावाच्या वतीने 24 दिवसाचे साखळी उपोषण सुरू आहे. यामध्ये मुढवी, बठाण, उचेठाण या गावाच्या वतीने करण्यात आलेल्या साखळी उपोषण स्थळी प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसची आढावा बैठक संपवून जाताना आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,अॅड रविकिरण कोळेकर, मनोज माळी, भीमराव मोरे, मारुती वाकडे, शिवशंकर कवचाळे,विष्णू शिंदे,आदी सह युवराज घुले,सतीश दत्तू, दत्तात्रय भोसले, महावीर ठेंगील,संभाजी घुले, बिभीषण बेदरे, भारत बेदरे,

आदीसह आंदोलक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्या वतीने युवराज घुले यांनी राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाचा विषय महत्वाचा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकारची भूमिका ही चाल ढकलीची आहे.

विरोधी पक्ष म्हणून आपण आरक्षणप्रश्नी आवाज उठवावा अशी मागणी केल्यानंतर आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या की हिवाळी अधिवेशनामध्ये शोक प्रस्ताव सादर केल्यानंतर आम्ही काँग्रेसचे सर्व आमदार मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयीची भूमिका लावून धरणार असून प्रसंगी सभागृहाचे कामकाज बंद ठेवण्यात देखील आम्ही कमी पडणार नाही.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीला जी भूमिका मांडली ती भूमिका काँग्रेस पक्षाची नाही ती त्यांची वैयक्तिक होती नंतर ते त्या भूमिकेपासून दूर गेलेले आहेत. सत्ताधारी पक्षातील जबाबदार मंत्री छगन भुजबळ यांनी यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आक्षेप घेत,

वेगवेगळे मते नोंदवले त्यावर बोलताना शिंदे म्हणाल्या की समाजात तेढ होईल असे वक्तव्य कोणी करू नयेत आणि केलेली वक्तव्य चुकीचे असल्याची भूमिका त्या भूमिकेशी आपण समर्थन करत नसल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी काँग्रेस कार्यालयात चालत जाऊन काँग्रेसच्या नवीन कार्यालयाला भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT