सोलापूर

Solapur : तब्बल ४१५ गावांत राजकीय नेत्यांना बंदी; सोलापूर जिल्ह्यातील ११४ गावांमध्ये उपोषण आंदोलन, जरांगेंना पाठिंबा

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा

Solapur : तब्बल ४१५ गावांत राजकीय नेत्यांना बंदी; सोलापूर जिल्ह्यातील ११४ गावांमध्ये उपोषण आंदोलन, जरांगेंना पाठिंबा

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरू

maratha reservation protest political leaders ban in 415 village of solapur manoj jarange patil

सोलापूर : मराठा आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मराठा समाज बांधवांनी राजकीय पदाधिकारी व नेत्यांना गावबंदी केली आहे. गुरुवारपर्यंत (ता. २) जिल्ह्यातील ४१५ गावांत पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. तर ११४ गावांत उपोषण सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन सुरू केले आहे. दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावोगावी पोचले आहे. आरक्षणाचा प्रश्न न सुटल्याने मराठा समाजबांधव लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांवर संतप्त झाले आहेत.

त्यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. जिल्ह्यात ४१५ गावांमध्ये त्यांना गावात प्रवेशास बंदी घातली आहे. तर ११४ गावांमध्ये बेमुदत व साखळी उपोषण सुरू आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात मेणबत्ती मोर्चासह वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे.

आंदोलनाच्या सुरवातीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलनकर्त्यांनी एसटी बसला आग लावली होती. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर टाकून पेटवून दिले होते. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनानंतर जिल्ह्यात शांततेत व सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. त्याला अन्य समाजाकडूनही पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सायंकाळपर्यंत कुठेही अनुचित घटना घडली नव्हती. याला पोलिसांनीही पुष्टी दिली.

८०० होमगार्ड मागवले

मराठा आरक्षण आंदोलन खेडोपाडीही पसरले आहे. तर दहा दिवसांनंतरही हे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्या बंद केल्या होत्या. तसेच रजेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस ठाणे स्तरावर कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. बंदोबस्तासाठी ८०० होमगार्डही नेमले आहेत.

जिल्ह्यात प्रत्येक गावात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू आहे. आम्ही लोकप्रतिनिधी व नेत्यांना गावबंदी केली आहे. त्यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून संवेदना व्यक्त करण्याऐवजी सरकारकडे मराठा समाजाच्या भावना मांडाव्यात, ही आमची मागणी आहे. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आतील ओबीसी आरक्षण मिळावे, ही आमची मागणी आहे. ही मागणी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी सरकारकडे पोचवून आम्हाला आरक्षण मिळवून द्यावे.

- माऊली पवार, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT