Haji bashirbhai tambole Sakal
सोलापूर

Maratha Reservation : सांगोला येथे मराठा आरक्षण आंदोलनाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा

हाजी बशीरभाई तांबोळी म्हणाले की, आत्तापर्यंतचा सांगोला शहर व तालुक्याचा इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठया भावाची भूमिका बजावली आहे.

दत्तात्रय खंडागळे

सांगोला - राज्यभर सुरू असलेला मराठा समाज बांधवांचा आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली बुध. दि. 1 नोव्हें. रोजी पाठिंबा दिला आहे.

या प्रसंगी मुस्लिम समाजाचे प्रमुख हाजी शब्बीरभाई खतीब म्हणाले की, मराठा समाज आपल्या न्याय व हक्कासाठी आरक्षणाची मागणी करत आहे, तरी या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला सांगोला शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर करतो.

यावेळी बोलताना हाजी बशीरभाई तांबोळी म्हणाले की, आत्तापर्यंतचा सांगोला शहर व तालुक्याचा इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठया भावाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांचे आरक्षणासाठी सुरु असलेल्या लढाई मध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाज नेहमीच आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही यावेळी हाजी बशीरभाई तांबोळी यांनी दिली.

यावेळी अरविंद केदार यांनी सांगोला शहर व तालुक्यातील आंदोलनासाठी मिळत असलेल्या समस्त मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी सकल मराठा समाज बांधव व मुस्लिम समाजातील कमरुद्दीन खतीब, शफी इनामदार, आयाजबाबा मणेरी, ईलाही खतीब, मिनाज खतीब व गुलामगौस तांबोळी, मज्जिद खतीब, तोफिक मुजावर, रफीक आतार, मोहसीन खतीब, असीफ इनामदार, साहिल खतीब, नवाज तांबोळी, निहाल खतीब, इम्तियाज मणेरी आदींसह मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

जीगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

Waris Pathan: वारिस पठाण पत्रकार परिषद सुरु असतानाच ढसाढसा रडले, म्हणाले, सगळेच माझ्या मागे हात धुवून मागे लागले अन...

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

SCROLL FOR NEXT