Fraud 
सोलापूर

जनधन खाते उघडून देतो म्हणून "या' गावातील 429 महिलांची केली फसवणूक; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : जनधन योजनेचे खाते उघडून देतो म्हणून फॉर्म भरून घेऊन, प्रत्येकी 60 रुपयांप्रमाणे 429 लोकांचे 25 हजार 740 रुपये गोळा करून फसवणूक केल्या प्रकरणी वैभव बर्गे (रा. भांबुर्डी, ता. माळशिरस) याच्यावर माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की मेडद (ता. माळशिरस) येथे जाऊन वैभव बर्गे याने वनिता शेगर, चिंगूबाई शेगर, नीलम शेगर व इतर महिलांना "मला बॅंक आँफ महाराष्ट्र, शाखा माळशिरस येथून पाठविले असून, मला खेड्यातील महिलांची जनधन योजनेतून खाती उघडण्यास सांगितले आहे. तुम्ही माझ्याकडील बॅंकेचा फॉर्म भरून द्या. मी तुम्हाला खाते उघडून देतो' असे सांगितले. त्यावर या महिलांनी प्रत्येकी 60 रुपये देऊन फॉर्म भरून दिले. 7 जुलै ते 15 जुलैपर्यंत 429 महिलांचे प्रत्येकी 60 रुपये याप्रमाणे फॉर्म भरून घेतले. 

पैसे घेऊन फॉर्म घेतले पण पुढे खातेही नाही व पासबुकही दिले नाही. याबाबत महिलांनी वैभव बर्गेकडे याच्याकडे खात्याबाबात चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी काही महिलांनी माळशिरस येथे जाऊन बॅंकेत चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी माळशिरस पोलिसांत वैभव बर्गे याने फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे. माळशिरस पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT