Madha Lok Sabha Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha: माढ्यासाठी ‘देवगिरी-सागर’वर खलबतं! तिढा सुटणार की मोहिते-पाटील बंडाचे निशाण फडकवणार?

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातील पेच सोडविण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा बैठकींचा सिलसिला सुरू आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर तर विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील आणि रामराजेंचा तीव्र विरोध आहे. मात्र, भाजपही निंबाळकरांच्या उमेदवारीवर ठाम आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने मोहिते-पाटील हे बंडाचे निशाण फडकाविण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना चर्चेसाठी तातडीने सागर बंगल्यावर पाचारण केले होते. या बैठकीतील तपशील बाहेर आला नाही. मात्र माढा मतदारसंघातील तिढा सोडविण्याच्या दृष्टिकोनातून भाजपकडून वेगवान हालचाली केल्या जात असल्याचे आज दिवसभरात दिसून आले.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी डावलण्यात आल्यानंतर मोहिते-पाटील हे कमालीचे आक्रमक झाले आहेत, त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. जयसिंह मोहिते-पाटील यांनी तर आम्ही तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तत्पूर्वी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवरत्न बंगल्यावर जाऊन मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. कोल्हे यांच्या बुधवार (ता. २७) दुपारच्या भेटीनंतर सायंकाळी पुण्यात एक लग्नात विजयसिंह मोहिते-पाटील आणि ज्येष्ठ नेते शरद पवार एकत्र आले होते. त्यांच्यात अधूनमधून चर्चा सुरू होती, त्यामुळे मोहिते-पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: बंदी असूनही जड वाहने रस्त्यावर, वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण

28 Four, 18 Sixes! झिम्बाब्वेने T20 मध्ये ठोकल्या तब्बल २८६ धावा! भारताचा विक्रम थोडक्यात वाचला

Akhilesh Yadav : भाजपकडून माणसे तोडण्याचे काम : खासदार अखिलेश यादव

Winter Health Care: हिवाळ्यात दिवसभर उत्साही अन् हायड्रेट राहायचंय? मग स्वत:ची 'अशी' घ्या काळजी

Latest Maharashtra News Updates LIVE : निलेश राणे वर्षा बंगल्यावर दाखल

SCROLL FOR NEXT