Migratory birds arrive late and leave early Impact of pollution and climate change on biodiversity Ujani Reservoir solapur sakal
सोलापूर

Solapur : स्थलांतरित पक्षी येतात उशिरा अन् जातात लवकर

उजनी जलाशयातील प्रदूषण अन्‌ हवामान बदलाचा जैवविविधतेवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

केत्तूर : उजनी धरणातील वाढते मानवनिर्मित प्रदूषण शेतकऱ्यांसह देशी, विदेशी पक्ष्यांच्या मुळावर उठले आहे. त्यातच वारंवार बदलते हवामान हेही यास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे उजनी जलाशयावर येणारे स्थलांतरित पक्षी उशिरा येऊन अन् लवकर परतीच्या प्रवासाला निघत आहेत.

यामुळे पक्षीप्रेमीचे प्रमुख आकर्षण असणारे फ्लेमिंगो, चक्रवाक बदके, पट्कदब, मत्स्यघार, पट्टकंदब, गल पक्षी, ब्राह्मणी बदक, बिनहंस आदींची संख्या यावर्षीही मोठ्या प्रमाणावर घटली असल्याचे दिसून येत आहे.

उजनी धरणाच्या अथांग पसरलेल्या पाणीसाठ्यात पक्ष्याचे असणारे खाद्य लहान मासे, किडे, पान गवत मुबलक प्रमाणात निर्माण होते. धरणातील पाणीसाठा कमी होऊन पाणथळ जागा तयार होण्यास सुरवात होते.

नेमक्या या सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात देशी-विदेशी पक्ष्यांची मांदियाळी उजनी जलाशयावर जमत असताना. या पक्ष्यांमुळे उजनीचे महत्त्व वाढलेले असले तरी पक्षाच्या सुरक्षेसंदर्भात शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत.

उजनी धरण परिसरात देश-विदेशातून हजारो किलोमीटरचे अंतर पार करून रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांसह शेकडो विविध जातीचे अनेक पक्षी आवर्जून हजेरी लावतात. उजनी धरण भरून शांत झाल्यावर पाण्यावर प्रदूषित पाण्याचा हिरवट रंग तयार होतो व संपूर्ण धरण प्रदूषित झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.

यावेळी पाण्याशी समरस होणारे पक्षी येथे थांबतात व बाकीचे पक्षी एप्रिल-मेच्या दरम्यान परतीच्या प्रवासाला लागतात.

तरच उजनीतील पक्षी सौंदर्य टिकेल

पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या महाकाय शहरासह परिसरातील मैलामिश्रित तसेच विविध कंपनीमधील केमिकलयुक्त पाणी थेट उजनीमध्ये मिसळले जाते. तसेच पावसाळ्याच्या दिवसात नागरिक कपडे व इतरत्र वस्तूही पाण्याबरोबर सोडतात.

त्यामुळे ते थेट उजनी येतात. त्यामुळे दरवर्षी प्रदूषणाची पातळी वाढत जात आहे. त्यामुळे देशी-विदेशी पक्षांची संख्या वरचेवर कमी होताना दिसून येत आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर काम होणे गरजेचे असून असे झाले तरच उजनीतील पक्षी सौंदर्य टिकविण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT