मोहोळ : रविवार ता 27 रोजी दुपारी मोहोळ तालुक्यातील पापरी, खंडाळी, येवती सह अन्य गावात वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे व लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पापरी आणि परिसरात मोठे वादळ झाले. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. तर डाळिंब, द्राक्ष, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. पॉलिहाऊस हि उखडून पडली. आमदार शिंदे यांनी पापरी येथील पाटील वस्ती, टेकळे वस्ती आदी सह अन्य भागाला भेट दिली व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त व लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यास बाबत विनंती करणार असल्याचे सांगितले.
विक्रांत पाटील यांनी ही तात्या भोसले यांच्या पडलेल्या घराची तसेच अन्य नुकसानीची पाहणी केली. या बाबत आपण आमदार यशवंत माने व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून वस्तुस्थिती त्यांच्या कानावर घालून अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत देण्याविषयी विनंती करणार आहे. तसेच पंचनामे ज्यादा कर्मचारी नियुक्त करून लवकरात लवकर करण्या बाबत तहसीलदार मुळे यांच्याशी चर्चा केली असल्याचे ही पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.