'कॅबिनेट'साठी प्रणिती शिंदेंकडून भाजप टार्गेट ! हॅट्ट्रिकनंतरही पक्षाने डावलले  Canva
सोलापूर

'कॅबिनेट'साठी प्रणिती शिंदेंकडून भाजप टार्गेट !

'कॅबिनेट'साठी प्रणिती शिंदेंकडून भाजप टार्गेट ! हॅट्ट्रिकनंतरही पक्षाने डावलले

तात्या लांडगे

कॉंग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री आदी विविध पदे दिली. मात्र, त्यांना मागील दोन लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.

सोलापूर : मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी विजय संपादन केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि एमआयएमसह (MIM) अपक्षांचे तगडे आव्हान असतानाही त्यांनी विजय मिळवला. हॅट्ट्रिक केल्यानंतर पक्षाकडून त्यांना कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) म्हणून संधी मिळेल, असा विश्‍वास सर्वांनाच होता. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हेदेखील नाराज झाल्याची चर्चा आहे. तरीही, विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल असा विश्‍वास अजूनही त्यांना आहे. राज्यभरातील दौऱ्यात त्या भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर आवर्जून निशाणा साधून पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

कॉंग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदापासून केंद्रीय ऊर्जामंत्री, गृहमंत्री आदी विविध पदे दिली. मात्र, त्यांना मागील दोन लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या दोन्ही नवख्या उमेदवारांकडून पराभव झाल्याने त्यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुलीचे कर्तृत्व पाहून पक्षाने तिला वेळोवेळी चांगली संधी द्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या शब्दाला पक्षात किंमत राहिली नसल्याचे वक्‍तव्य केल्याची चर्चा झाली. तत्पूर्वी, राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल, पक्षश्रेष्ठी आपल्या कामाची दखल घेईल म्हणून आमदार प्रणिती शिंदे या राज्यभर दौरे करीत आहेत. दौऱ्याच्या शेवटी त्या कोरोनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहेत. तर सोलापूर शहरात त्यांनी भाजपकडील मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करायला सुरवात केली आहे. पक्षातील त्यांचे काम निश्‍चितपणे चांगले असून त्यांना आगामी काळात मंत्रिपदाची संधी मिळेल का, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तरीही, 2009 आणि 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये त्यांना विजयासाठी ताण काढावा लागला. त्यामुळे पुढे कॉंग्रेसकडून त्या लोकसभेच्या उमेदवार असतील, असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे. मात्र, तीनवेळा विजय मिळूनही मंत्रिपद न मिळाल्याने लोकसभा की विधानसभा यातून त्या "मध्य' कसे साधतील, याची उत्सुकता आहे.

पदाची अपेक्षा नाही म्हणताय, पण मनात काय?

पक्षनिष्ठेने काम करताना अनेक वर्षांनंतरही स्वप्नातील पदावर संधी न मिळालेले पदाधिकारी अस्वस्थ होतात. यंदा नाही तर पुढच्या वेळी संधी मिळेल, असा त्यांना आत्मविश्‍वास असतो. मात्र, अनेक निवडणुका होऊनही आपल्यापेक्षा मागून आलेल्या अथवा पक्षांतर करून आलेल्यांना संधी मिळते, तेव्हा त्यांची अस्वस्था वाढते, ही वस्तुस्थिती आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाबद्दल कधीही विचारले तर त्या म्हणतात, मला पदाची अपेक्षा नाही; मात्र त्यांचे हे वक्‍तव्य खरेच मनापासून आहे की वरवरचे आहे, याचा शोध लावणे कठीण आहे. ऑगस्टअखेरीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांना आगामी काळात मंत्रिपद मिळेल की नाही, याबद्दल स्पष्टता करून कार्यकर्त्यांना बळ देतील, अशी पदाधिकाऱ्यांना आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

Bramhapuri Assembly Election Results 2024 : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांनी घातला विजय मुकुट! तब्बल 'इतक्या' मतांनी विजयी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Guhagar Assembly Election 2024 Results : गुहागरचा गड शिवसेना ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी राखला; महायुतीच्या राजेश बेंडलांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT