praniti-shinde.jpg esakal
सोलापूर

आमदार प्रणिती म्हणाल्या, योगी, महाराज राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे

योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणात नाही. ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

तात्या लांडगे

सोलापूर : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत निश्‍चितपणे कॉंग्रेसला मोठे यश येईल. महापालिकेवर कॉंग्रेसचाच झेंडा फडकणार आहे. सर्वसामान्य जनता हीच कॉंग्रेसची ताकद आहे. कॉंग्रेसच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत साडेतीनशे रुपये होती, पण आता एक हजारांवर तो पोहचला आहे. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी मते मागत आहेत. योगी आणि महाराजांची जागा मंदिर, मठात असून राजकारणात नाही. ते राजकारणात आल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली. जाती-धर्मात भांडण लावून निवडणुका जिंकल्या जात आहेत. तरीही, दोनवेळा लोकसभेला पराभव झाला म्हणून खचून न जाताना पुन्हा जोमाने लढायला हवे.

शहर कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्यात, माजी गटनेते म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्रास दिला जातोय. त्यामुळे 'आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागू देईना' अशी आमची आवस्था झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांकडून कॉंग्रेस नगरसेवकांना निधी दिला जात नसल्याची तक्रार माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केली. हेरिटेज येथील कॉंग्रेसच्या विजयी संकल्प मेळाव्याप्रसंगी कॉंग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यावेळी सर्वप्रथम चेतन नरोटे हे म्हणाले, दररोज पाणी देतो म्हणून सत्तेवर बसलेल्या भाजपच्या काळात सहा दिवसआड पाणी मिळत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय्य भाजपचे नेतेमंडळी घेत आहेत. त्यानंतर बाबा मिस्त्री म्हणाले, कॉंग्रेस हा खूप मोठा पक्ष असून कोणी गेल्याने तो संपणार नाही. पण, आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्री करण्याची गरज आहे. जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील म्हणाले, वीजेचा प्रश्‍न सध्या गंभीर असून शेतकऱ्यांना वीज माफी मिळायला हवी. माजी मंत्री म्हेत्रे म्हणाले, एकमेकांना खाली खेचण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर शहर-जिल्ह्यासाठी खूप काही काम केले. त्यांच्यानंतर राज्याच्या राजकारणात आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी. राज्यातील सर्व महामंडळातील अध्यक्षांच्या निवडी तातडीने करून महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.
- प्रकाश यलगुलवार, माजी आमदार

नाना पटोलेंच्या रुपाने कॉंग्रेसला उभारी देणारा सरसेनापती मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली निश्‍चितपणे आगामी काळात कॉंग्रेसची यशस्वी वाटचाल सुरु राहील. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद मिळायलाच हवे. पण, नानाभाऊ तुम्ही ऊर्जामंत्री व्हायला हवे म्हणजे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होईल. त्यासाठी मी सोनियाजींना पत्र लिहणार आहे.
- डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष, सोलापूर कॉंग्रेस

पक्षाअंतर्गत वादावादी, गटबाजीमुळे कॉंग्रेसची हानी झाली असून आपलेच लोक एकमेकांमध्ये साप सोडत आहेत. पण, ज्यांनी आपल्याला पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळवून दिला, त्यांच्यासोबत कायमस्वरुपी राहायला हवे. कॉंग्रेसच्या वाढीसाठी प्रत्येकांनी तळागाळापासून काम करायला हवे. आता नुसते 'तुम आगे बढो' म्हणून चालणार नाही.
- सिध्दाराम म्हेत्रे, माजी मंत्री

भाजप सत्ताधाऱ्यांना पाच वर्षांत ना दुहेरी पाईपलाइन करता आली, ना बजेट मांडता आले. स्थायी समितीचा अध्यक्षही निवडता आला नाही. आम्ही भाजपविरोधात लढताना राष्ट्रवादीकडून त्रास दिला जातोय. त्यामुळे आई जेवू देईना अन्‌ बाप भीक मागे देईना, अशी आमची आवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्या, शहर-जिल्ह्यातील कॉंग्रेसला बळकटी येईल.
- चेतन नरोटे, माजी गटनेते, सोलापूर महापालिका

कॉंग्रेसने मला दक्षिण सोलापूरमधून आमदारकीची उमेदवारी दिली आणि 59 हजार मते मिळविली. कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. पण, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पालकमंत्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कॉंग्रेस नगरसेवकांना काहीच निधी दिला नाही. त्यामुळे कॉंग्रेसला बळकट करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिपद द्यायला हवे.
- बाबा मिस्त्री, माजी नगरसेवक, सोलापूर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

Mumbai Local Train: मुंबईमध्ये उद्यापासून १३ नवीन AC लोकल धावणार; गाड्यांची संख्या ९६ वरुन १०६

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

SCROLL FOR NEXT