आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्‍तव्याने महेश कोठेंची वाढली चिंता ! Canva
सोलापूर

आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्‍तव्याने महेश कोठेंची वाढली चिंता!

आमदार प्रणिती शिंदेंच्या वक्‍तव्याने महेश कोठेंची वाढली चिंता !

तात्या लांडगे

"कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात' ही मोहीम आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात राबविली जात आहे.

सोलापूर : कॉंग्रेसने (Congress) आजवर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष दिले नाही. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील कॉंग्रेसची ताकद निश्‍चितपणे दाखवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांनी भाजपसह (BJP) अन्य पक्षांतील नेत्यांना दिला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी कॉंग्रेसने केल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे, आगामी विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले महेश कोठे (Mahesh Kothe) यांचीही चिंता वाढल्याची चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत कोठेंमुळे प्रणिती शिंदे यांना ताण काढावा लागला होता. (MLA Praniti Shinde's statement raised Mahesh Kothe's concern-ssd73)

"कॉंग्रेस मनामनात, कॉंग्रेस घराघरात' ही मोहीम आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून शहरात राबविली जात आहे. या मोहिमेचा सोमवारी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उत्तर कसबा परिसरात प्रारंभ झाला. या वेळी आमदार शिंदे बोलत होत्या. त्यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रवीण वाले, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे, हेमा चिंचोळकर, मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी वाले, नरोटे यांच्यासह अन्य नेत्यांनी भाजपविरुद्ध टीकेची झोड उठविली.

आमदार शिंदे म्हणाल्या, भाजपकडून सातत्याने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Former Union Minister Sushilkumar Shinde) यांच्यावर टीका केली जाते. परंतु, शिंदे यांनी काय केले, केवळ उजनीचे (Ujani Dam) पाणी आणले. उजनी, उजनी काय करताय, आहे का तुमच्यात हिंमत दुसरी पाइपलाइन आणण्याची? किती वर्षे आम्ही दुहेरी पाइपलाइनचे नाव ऐकतो. त्यांचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही त्यांना ते जमले नाही. केंद्र सरकारने हॉस्पिटल, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन पुरेशा प्रमाणात दिले असते, तर एवढ्या लोकांचे बळी गेले नसते, असा आरोपही त्यांनी केला.

शहराच्या तीन टक्‍के भागात स्मार्ट सिटी

भाजप सत्ताधाऱ्यांनी शहरवासीयांच्या घराघरात पाणी आणण्याऐवजी महागाई आणली. जातीच्या नावाखाली त्यांनी आजवर राजकारण केले. स्मार्ट सिटीच्या (Smart City) नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. वाय-फायने लोकांची पोटं भरणार नाहीत. शहराच्या एकूण परिसरातील तीन टक्‍के भागात स्मार्ट सिटी होत आहे. हातावरील पोट असलेल्या लोकांसाठी काहीच केले जात नाही. केवळ टक्‍केवारीतून स्वत:ची आणि कंत्राटदारांची पोटं मोठी केली, अशीही टीका आमदार शिंदे यांनी केली. दुसरीकडे, नगरसेवक चेतन नरोट यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकतरी रस्ता चांगला दाखवा, नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असे आव्हान या वेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT