ठाकरे सरकारमुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात : आमदार परिचारक Sakal
सोलापूर

ठाकरे सरकारमुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात : आमदार परिचारक

ठाकरे सरकारमुळे हजारो शेतकऱ्यांची दिवाळी आंधारात : आमदार परिचारक

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, अशी टीका आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.

पंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टीमुळे राज्यातील 55 लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 100 लाख हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत आणि ठाकरे सरकार (Thackeray government) हेक्‍टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्यांची चेष्टा करत आहे. ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, अशी टीका आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी येथे पत्रकार केली.

आमदार परिचारक म्हणाले, वारेमाप आश्वासने आणि घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी. ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्‍यग्रस्त झाला असून, आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार हे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. अशा दु:खद परिस्थितीमुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून 'मातोश्री', 'वर्षा' आणि 'मंत्रालय' मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे.

गेल्या महिना अखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या 28 लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या 973 कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्यांच्या हातात फुटकी कवडी पडलेली नाही, असेही परिचारक म्हणाले.

पत्रकार परिषदेस मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, शहराध्यक्ष विक्रम शिरसट, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके, सुनील भोसले, लाला पानकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मशागतीसाठी अतिरिक्त मदत द्यावी

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले, अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना जमिनीच्या मशागतीसाठी हेक्‍टरी 40 हजार रुपये अतिरिक्त मदत त्वरित द्यावी. तसेच संपूर्ण वर्षाचे वीजबिल माफ करावे, अशी आमची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT