सोलापूर

औद्योगिक वसाहत योजनेच्या निधीसाठी शरद पवारांची भेट घेणार : आ. राऊत

प्रशांत काळे

बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा शेतकरी वर्ग आहे, त्यांनी बार्शी तालुक्यासाठी रखडलेल्या योजनांना निधी द्यावा, ढळते माप मिळवण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे आमदार राऊत यांनी यावेळी सांगितले.

बार्शी (सोलापूर) : बार्शी तालुक्याची उपसासिंचन योजना, शासकीय औद्योगिक वसाहत मंजूर होऊन 25 वर्षे होऊन गेली तरी अद्याप कामे रखडली आहेत. निधीची कमतरता भासत असून मी अपक्ष आमदार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली असून राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची लवकरच भेट घेणार आहे, अशी माहिती बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (MLA rajendra raut) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (MLA rajendra raut said that he will meet NCP president sharad pawar for funding of sub-irrigation and industrial estate scheme)

बार्शी तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणारा शेतकरी वर्ग आहे, त्यांनी बार्शी तालुक्यासाठी रखडलेल्या योजनांना निधी द्यावा, ढळते माप मिळवण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचे आमदार राऊत यांनी यावेळी सांगितले.

बार्शी तालुक्यासाठी 1995-96 मध्ये या दोन्ही योजना मंजूर झाल्या आहेत. पण विरोधक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केलेला नाही. शासकीय औद्योगिक वसाहत होण्यास माजीमंत्री दिलीप सोपल यांचा प्रखर विरोध होता. खासगी तीन औद्योगिक वसाहती कार्यरत असून त्यांचे बंधू अध्यक्ष आहेत. शासकीय झाली तर महत्व कमी होईल यामुळे त्यांनी प्रयत्न केला नाही असा आरोप माजीमंत्री सोपल यांचेवर केला.

तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून 2009 मध्ये लोकप्रतिनिधी असताना 135 एकर क्षेत्र भूसंपादन केले, तीन कोटी मोबदला शेतकऱ्यांना दिला होता. हा प्रश्न पुन्हा खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी हातात घेतला असून वीज उपकेंद्र व पाण्याची व्यवस्था केली आहे. माजीमंत्री दिलीप सोपल हेच माझे विरोधक आहेत, आम्हा दोघांची हयात राजकारणात गेली आहे. पण सोपलांचे बोट धरुन राजकारणात येण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असा अप्रत्यक्ष टोला राजेंद्र मिरगणे यांना आमदार राऊत यांनी लगावला.

पर्यटनस्थळ योजनेतून भक्त निवास, बार्शी नगरपरिषद इमारत पाच कोटी, पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर, वैराग ग्रामीण प्रशिक्षण केंद्र अशा तालुक्याच्या विकासासाठी पवार साहेबांची भेट घेणार आहे, विरोधकांनी खो घालू नये, विकासासाठी सोबत रहावे, कोरोना कालावधीतही शासनाने 25 कोटी निधी दिला असे आमदार राऊत यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत, पंचायत समिती सभापती अनील डिसले, संचालक रावसाहेब मनगिरे, वसुदेव गायकवाड, झुंबर जाधव उपस्थित होते. (MLA rajendra raut said that he will meet NCP president sharad pawar for funding of sub-irrigation and industrial estate scheme)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT